शिवसेनेच्या सहाय्यता कक्षातर्फे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:21+5:302021-03-15T04:15:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवसेना महानगरतर्फे शहरातील नागरिकांना जनता कर्फ्यूच्या काळात मदत करण्यासाठी पांडे चौक येथे सहाय्यता कक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवसेना महानगरतर्फे शहरातील नागरिकांना जनता कर्फ्यूच्या काळात मदत करण्यासाठी पांडे चौक येथे सहाय्यता कक्ष उघडण्यात आले होते. या कक्षातर्फे मागील तीन दिवसात १३ कुटुंबांना रूग्णालयातून घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली तसेच ९८ नागरिकांना भोजन, २१ रूग्णांना रूग्णालयातून घरी जाण्यासाठी रिक्षा, ७८ नागरिकांची कोविड लसकरिता ऑनलाईन नोंदणी, तर काही नागरिकांना कोरोना चाचणी करण्यासाठी मदत करण्यात आली. आतापर्यंत या सहाय्यता कक्षातर्फे विविध प्रकारची मदत गरजू नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यासाठी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, विराज कावडिया, विभागप्रमुख प्रशांत सुरळकर, संघटक दिनेश जगताप, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, जाकीर पठाण, पियुष हसवाल, प्रीतम शिंदे, अमित जगताप, अर्जुन भारुळे, हितेश सूर्यवंशी, राहुल चव्हाण, प्रशांत वाणी, संदीप सूर्यवंशी, अमोल गोपाळ, शिवम महाजन, गोपाळ पाटील, गजेंद्र चौधरी, चंद्रकांत मराठे आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.