यावल पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेले महिलांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:13 AM2018-08-20T01:13:15+5:302018-08-20T01:16:17+5:30

अडावद ता. चोपडा येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपायाविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी गेल्या १३ आॅगस्टपासून यावल पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलेल्या तिघा महिलांचे उपोषण आज सोडण्यात आले. तक्रारीच्या फेरचौकशीचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी आमदार हरीभाऊ जावळेदेखील उपस्थित होते.

 Behind the fasting of the women who started before Yaval police station | यावल पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेले महिलांचे उपोषण मागे

यावल पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेले महिलांचे उपोषण मागे

googlenewsNext
ठळक मुद्देसात दिवसांपासून सुरू होते उपोषणउपचार करवून घेण्याची विनंतीही महिलांनी धुडकावून लावली होती.

यावल जि. जळगाव : अडावद ता. चोपडा येथील पोलीस अधिकाऱ्यासह एका पोलीस शिपायाबाबत केलेल्या तक्रारीची फेरचौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून मिळाल्यानंतर गेल्या ७ दिवसांपासून येथे उपोषणाला बसलेल्या ३ महिलांनी रविवारी आपले उपोषण मागे घेतले.
पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपायाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एका पोलीस पत्नीसह तीन महिलांचे येथील पोलीस ठाण्यासमोर गेल्या सात दिवसापासून उपोषण सुरू होते. त्या उपोषणाची रविवारी सांगता झाली आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांच्या उपस्थीतीत नूतन पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारीची अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचेकडून फेरचौकशी करण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषणार्थी महिलांनी आपले उपोषण सोडले. यावेळी उपोषणार्थी महिलांसह एम. बी. तडवी, मुनाफ तडवी, आरपीआयचे अरूण गजरे चर्चेत सहभागी झाले होते.
१३ आॅगस्टपासून उपोषण
दिड महिना होवूनही पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्याने १३ आॅगष्टपासून पिडीत महिलेसह तीन महिलांनी येथील पोलीस ठाण्यासमोर उपोषणास सुरवात केली होती . दरम्यान, या उपोषणार्थी महिलांची प्रकृती खालावली होती. तथापि त्यांनी उपचारार्थ दवाखान्यात दाखल होण्यास नकार दिल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी उपोषणस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. दरम्यान, रविवारी आमदार हरीभाऊ जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सातव्या दिवशी उपोषणाची सांगता झाली आहे.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्यासह आदिवासी बांधव व नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.

तालुक्यातील मोहराळा येथील ४० वर्षीय विवाहितेचा पती अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना पोलीस ठाण्याचे इन्चार्ज सपोनि जयपाल हिरे यांनी विवाहितेच्या घरी जावून विनयभंग केल्याचा तिचा आरोप आहे. तसेच ही विवाहिता पतीचे औषध घेण्यासाठी यावलला आली असता येथील बुरूज चौकात शिपाई कदीर शेख यांनी सपोनि हिरे यांचाच निरोप घेवून आलो असल्याचे सांगत तिला गैरनिरोप दिला होता. यावरून पोलीस पत्नीने २४ जून रोजी येथील पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द तक्रार दिली होती. या तक्रारीवर पोलीस अधिकारी यांच्यामार्फत चौकशी झाली, मात्र ती चौकशी निष्पक्ष झाली नसल्याचा पिडीत महिलेचा आरोप आहे.

 

Web Title:  Behind the fasting of the women who started before Yaval police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.