यावल येथे पाणी ओव्हर फ्लो होत असल्याने शेतात जाणे झाले अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:42 AM2018-10-29T00:42:34+5:302018-10-29T00:43:18+5:30
यावल येथील सातोद रस्त्यावरील उर्दू शाळेच्या पाठीमागून जाणाऱ्या शेतीच्या रस्त्यावर परिसरातील वस्त्यातील सांडपाण्यासह पालिकेच्या टाकीचे ओव्हरफ्लो होणारे पाणी थांबतच नसल्याने शेतकºयांना शेतीत जाणे मुश्कील झाले आहे.
यावल, जि.जळगाव : येथील सातोद रस्त्यावरील उर्दू शाळेच्या पाठीमागून जाणाऱ्या शेतीच्या रस्त्यावर परिसरातील वस्त्यातील सांडपाण्यासह पालिकेच्या टाकीचे ओव्हरफ्लो होणारे पाणी थांबतच नसल्याने शेतकºयांना शेतीत जाणे मुश्कील झाले आहे. दुचाकीवरून जाणाºया अनेक शेतकºयांचे अपघात होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
येथील सातोद रस्त्यावरील जि प. उर्दू शाळेच्या पाठीमागून खडकाई नदीपात्रातून शहरातील शेतकºयाच्या शेतीत जाण्यासाठी असलेला रस्ता उंच-सखल भागाचा आहे. परिसरातील वस्त्यांचे पाणी वाहून जाण्यासाठी पालिकेने कोणतीही व्यवस्था न केल्याने रहीवाशांचे सांडपाणी तसेच या वस्तीतील नळाचे ओव्हर फ्लो झालेले पाणी रस्त्यावरून वाहत जावून खोलगट भागात साचते. रस्ता कच्चा असल्याने बैलगाड्या, ट्रॅक्टरची वाहतूक असल्याने मोठमोठे खड्डे पडल्याने सांडपाणी त्यात जावून थांबत असल्याने दुचाकीवरून जाणा-या शेतकºयांचे अपघात होत आहे. अनेक वेळा या रस्त्यावर शेतकºयांनी सामूहिक खर्च करून दगड-मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, मात्र सततच्या वाहतुकीने रस्ता परत ‘जैसे थे’ होत असल्याने शेतकरी कमालीचे कंटाळले आहेत. याबाबत पालिकेने रस्त्यावरून वाहणाºया पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही शेतकºयांनी केली आहे, मात्र त्याकडे ना पालिका लक्ष देते, ना लोकप्रतिनिधी, शासनाच्या शेतीरस्त्यासाठी असलेली योजना या रस्त्याकडे केव्हा पाहणार आहे, असा संतप्त प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत.