सर्जा-राजाला सजविण्यासाठी बळीराजा सरसावला

By admin | Published: September 11, 2015 09:42 PM2015-09-11T21:42:18+5:302015-09-11T21:42:18+5:30

दुष्काळी स्थितीचा अडथळा नाही तळोद्याच्या आठवडे बाजारात मोठी उलाढाल

Bejaraja was worn to decorate the king | सर्जा-राजाला सजविण्यासाठी बळीराजा सरसावला

सर्जा-राजाला सजविण्यासाठी बळीराजा सरसावला

Next
ोदा तालुक्यातील ग्रामीण भागात काहीशी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असतानाही आयुष्यभर आपल्या मालकासाठी मेहनत करणा:या सर्जा-राजाचे पूजन करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. शुक्रवारी तळोद्याचा बाजार असल्याने या दिवशी ग्रामीण भागातून बळीराजा मोठय़ा प्रमाणावर बैलजोडीच्या सजावटीसाठी लागणारे गोंडे, नाथ, घुंगरू, मोरखे, शिखे, तसेच रंग ह्या वस्तू खरेदीसाठी बाजारात दाखल झाल्याचे चित्र होते.सध्या ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणावर ट्रॅक्टरने मशागत होत असल्याने बहुतांश शेतकरी बैलजोडी ठेवत नाही. तळोदा तालुक्यातील सपाटीच्या गावांमध्ये बोटावर मोजण्याइतक्या बैलजोडय़ा असल्याचे दिसून येते. सातपुडा पायथ्यालगतच्या गावांमधील रोझवा पुनर्वसन वसाहतीत सर्वाधिक दीडशेच्यावर बैलजोडय़ा आजही आहेत. गावात प्रत्येक शेतक:याकडे बैलजोडी आहे. तर काहींकडे दोन बैलजोडय़ा आहेत. या वसाहतीत पोळ्याच्या दिवशी सर्जा-राजाला सजवण्यासाठी जणू स्पर्धाच लागते. पुनर्वसन वसाहतीतील काही अल्पभूधारक शेतकरी आपली शेतीची कामे आटोपून रांझणीसह परिसरात शेती मशागतीच्या कामासाठी बैलजोडीसह औत पाचशे रुपये प्रती दिवस देत असतात. त्यामुळे शेतीसोबत त्यांना सर्जा-राजामुळे चांगलाच रोजगार उपलब्ध होत असतो.गावात भरपूर बैलजोडय़ा असून, रांझणी परिसरातून भाडय़ाने बैलजोडय़ा, औत घेणारे येत असतात. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध होत असल्याने सर्जा-राजा शेतीचे कामे करूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आर्थिक अडचण भासू देत नसल्यामुळे त्याचे पूजन व पोळा सण दरवर्षी मोठय़ा उत्साहात साजरा करतो.

Web Title: Bejaraja was worn to decorate the king

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.