भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्राम पंचायतीतर्फे सामाजिक स्थळी ठेवले बेंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:22 PM2018-12-02T23:22:28+5:302018-12-02T23:23:29+5:30
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनातर्फे वेडीमाता मंदिर परिसरात व ईदगाह मैदान येथे प्रत्येकी दोन-दोन बेंच ठेवण्यात आले.
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनातर्फे वेडीमाता मंदिर परिसरात व ईदगाह मैदान येथे प्रत्येकी दोन-दोन बेंच ठेवण्यात आले.
सरपंच अनिल पाटील यांनी वेडीमाता मंदिर परिसरात बौद्ध समाज बांधवांसाठी दोन, तर मुस्लीम समाजबांधवांच्या ईदगाह येथे दोन बेंच ठेवले. बेंचमुळे सामाजिक कार्यासाठी ताटकळत उभे राहणाºया वयोवृद्धांची सोय झाली आहे.
तसेच प्रभाग तीनमध्ये बालू मिया परिसरातही तीन बेंच ठेवण्यात येणार आहेत. तसेच प्रभाग तीनमध्ये पटेल गल्ली ते भोळे गल्लीला जोडणारी पाच बाय शंभर फुटाच्या गल्लीमध्ये पेवर ब्लॉक बसविणार आहे. या छोट्या रस्त्याचा दिवसभर वयोवृध्द, लहान मुले, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात वापर करतात. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून अनेक ठिकाणी टोचणारे दगड रस्त्यावर दिसत आहे. तसेच रुंदीमध्ये पाच फूट असलेल्या बोळमध्ये दीड फूट भाग गटार आहे. यामुळे रस्ता आणखीनच त्रासदायक बनला आहे. गटारीवर जाळी बसविल्यास रस्त्याची रुंदी वाढेल. यामुळे ग्रामस्थांना मोठी सोय होणार आहे.
दरम्यान, सरपंच अनिल पाटील यांनी गल्लीमध्ये गटारीवर जाळी व संपूर्ण रस्त्यात पेवर ब्लॉक बसविणार असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.