विनाशिधापत्रिका धारक लाभार्थ्यांनाही मिळणार मोफत तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:49 PM2020-05-22T19:49:19+5:302020-05-22T19:49:33+5:30
दोन महिने प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ : आर्थिकृष्ट्या दुर्बल, विस्थापित मजुंराना लाभ
जळगाव : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये सामाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना मे व जून २०२० या दोन महिन्यांसाठी प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विस्थापित मजूर, रोजंदारीवरील मजूर यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे उद्््भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारने दिलेल्या निदेर्नानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये सामाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना मे व जून २०२० या दोन महिन्यांसाठी प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ देण्याचे निर्देश दिले आहेत.
या साठी लाभाथ्यार्ने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यांना शिधापत्रिका मिळालेली नाही तसेच अन्नधान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विस्थापित मजूर, रोजंदारीवरील मजूर यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
या लाभार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्यात येईल. अशा लाभार्थ्यांना त्यांचा प्रमाणित असलेला आधारकार्ड क्रमांक किंवा शासनाकडून देण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र पाहून त्यांची स्वतंत्र नोंद करावी लागणार आहे.
नगरसेवक, शिक्षक, ग्रामसेवक, सरपंचांची घेणार मदत
तांदूळ वितरणासाठी प्रत्येक वितरण केंद्रावर पुरेसा कर्मचारी वृंद उपलब्ध राहणार असून यासाठी त्या-त्या क्षेत्रातील दक्षता समितीच्या सदस्यांची, मनपा क्षेत्रात संबंधित नगरसेवक, शिक्षक, ग्रामीण भागात ग्रामसेवक, सरपंच यांची मदत घेतली जाणार आहे.
प्रत्येक स्वस्त धान्य वितरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.