जळगावात दहा लाखांच्या दागिन्यांसह बंगाली कारागीर फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2017 05:10 PM2017-03-22T17:10:49+5:302017-03-22T17:10:49+5:30

दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केला

Bengali craftsmen absconding with jewelery worth 10 lakh in Jalgaon | जळगावात दहा लाखांच्या दागिन्यांसह बंगाली कारागीर फरार

जळगावात दहा लाखांच्या दागिन्यांसह बंगाली कारागीर फरार

Next
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 22 - दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या कारागिरांच्या गावात चौकशीसाठी गेलेल्या सराफ व मध्यस्थीला त्यांच्या नातेवाईकांनी धमकी देऊन पिटाळून लावले आहे.
सचिन वसंतराव भामरे यांचे पिंप्राळा येथील सोमाणी व्यापारी संकुलात साई ज्वेलर्स नावाने दुकान आहे. भामरे हे सोने, चांदी घडविण्याचे तसेच खरेदी-विक्रीचे काम करतात.सुशांता सुनील कुंडू (रा.चुनाबाटी, ता.शिवपुर, जि.हावडा, पश्चिम बंगला) व राकेश अनंत अधिकारी (रा.धुलेकुंडू जि.हुगळी, पश्चिम बंगाल) दोन्ही.ह.मु.सिताराम प्लाझा, मारोती पेठ, जगताप मंगल कार्यालयासमोर जळगाव या दागिने घडविणाऱ्या कारागिरांशी त्यांची ९ वर्षापासून ओळख होती. २२ फेब्रुवारी रोजी भामरे यांच्याकडे दागिने घडविण्याची आॅर्डर आली. त्यामुळे भामरे यांनी राकेश व सुशांता या दोघांना कानातील रिंग ३ ग्रॅम ५३ जोडी, मंगळसूत्र पोत पेंडलसह ३५ ग्रॅमप्रमाणे २ नग व मंगळसूत्र वाटी २ ग्रॅम जोडी प्रमाणे ६० नग अशी आॅर्डर दिली. सोन्याचे बिस्कीट मिळताच सुशांता व राकेश या दोघांनी जळगावातून धूम ठोकली आहे.

Web Title: Bengali craftsmen absconding with jewelery worth 10 lakh in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.