हृदयावर चित्र रेखाटत मंत्री गिरीश महाजन यांना हटके शुभेच्छा
By विलास.बारी | Updated: May 17, 2023 23:42 IST2023-05-17T23:42:07+5:302023-05-17T23:42:19+5:30
जळगावातील पहलवानाची अजब शक्कल

हृदयावर चित्र रेखाटत मंत्री गिरीश महाजन यांना हटके शुभेच्छा
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: राज्याचे ग्रामविकास मंत्री व संकटमोचक गिरीश महाजन हे बुधवारी आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात येत असताना त्यांच्या एका पहेलवान कार्यकर्त्याने चक्क आपल्या छातीवर गिरीश महाजन यांचे चित्र काढत हटके शुभेच्छा दिल्या आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अनेक वर्षापासून आरोग्य सेवेत काम करत असून अनेक गोरगरीब नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याची भावना शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस असल्याने माझं दैवत तसेच मार्गदर्शक प्रेरणास्थान म्हणून मी त्यांचे चित्र माझ्या हृदयावर रेखाटले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आई-वडिलांनंतर मी सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्तिमत्व व दैवत म्हणून गिरीश महाजन यांना मानत असल्याचे पहेलवान शिवाजी रामदास पाटील यांनी म्हटले आहे.