रस्त्यावर कुणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:19 AM2021-09-22T04:19:36+5:302021-09-22T04:19:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रस्त्यावर तुमच्याशी कुणी विनाकारण वाद घालत असेल किंवा इतरांच्या भांडणात तुम्ही मध्यस्ती करायला जात ...

Beware if someone is arguing on the street for no reason! | रस्त्यावर कुणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान !

रस्त्यावर कुणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रस्त्यावर तुमच्याशी कुणी विनाकारण वाद घालत असेल किंवा इतरांच्या भांडणात तुम्ही मध्यस्ती करायला जात असाल तर सावधान. संबंधितांचा तुम्हाला लुटण्याचाही 'प्लॅन' असू शकतो. तेव्हा नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.जळगाव शहरात अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे. एमआयडीसीत तर एका कामगारालाच लुटण्यात आले होते. त्याशिवाय दोन महिला व दोन वृध्दांना रिक्षा चालकांनी लुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पोलीस दप्तरी त्याची नोंदही झालेली आहे.

गुन्हेगार सध्या चोऱ्या, लूटमार करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधत असून गुन्ह्याची पध्दत बदलत चालली आहे. बँकेच्या परिसरात किंवा गर्दीच्या ठिकाणी रेकी करीत असतात. नंतर त्यांची लुट केली जाते. वृध्दांच्या बाबतीत असे प्रकार घडत आहेत. चोपडा तालुक्यातील एका व्यक्तीची बँकेतून काढलेली २० लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. एखाद्याला टक्कर मारून किंवा काहीतरी क्षुल्लक कारणावरून वाद घालत असतात. त्यानंतर, त्याची लूट करतात. त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आपला उद्देश साध्य करण्यासाठी गुन्हेगार आपसात भांडणाचा बनाव करु शकतात. काहीवेळा ते मुद्दाम तुमच्या वाहनासमोर आडवे येतात. धक्का लागल्याचे नाटक करतात अन् नंतर पैसे उकळतात.वाद घालण्यासह प्रकरण मिटविण्यापर्यंत गुन्हेगारांची साखळी असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असे काही घडल्यास तत्काळ पोलिसांची मदत घ्यावी.

शहरात अनेकांची होतेय लूट

रिक्षा चालकांकडून अनेक ज्येष्ठांशी क्षुल्लक कारणातून वाद घालून त्याची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरात सध्या असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यातील आरोपी निष्पन्न करुन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शनी पेठ व एमआयडीसी पोलिसात असे दोन गुन्हे दाखल आहेत. पिंप्राळा शिवारात तर तीन वर्षापूर्वी धक्कादायक घटना घडली होती. एका वृध्देचेच अपहरण करुन झुडपात सोडून दिले होते.

असे तुमच्याही बाबतीत घडू शकते

१) काही महिन्यापूर्वी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात पिस्तूलचा धाक दाखवून हवाल्याचे १४ लाख रुपये लुटण्यात आले होते. यात आरोपींनी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. रस्त्यात ही गोळी मिळून आली होती. पोलिसांनी काही तासातच आरोपी निष्पन्न करुन धुळ्याच्या दोघांना अटक झाली होती. त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली होती.

२) रिक्षात बसलेल्या प्रवाशांना लुटल्याच्या तीन घटना शहरात घडल्या. परप्रांतीय वृध्दाला राजकमल टॉकीजजवळ तर जामनेरच्या व्यापाऱ्याला अजिंठा चौकातून बसविण्यात आले होते. पुढे नेरी नाका परिसरात मारहाण करुन लुटण्यात आले होते. एका रिक्षा चालकाने वृध्देला शहरभर फिरवून तिची सोन्याची पोत लुटली होती.

काय काळजी घ्याल...

रस्त्यावर धक्का लागला, कट का मारला, असे कारण काढून कोणी विनाकारण वाद वाढवित असेल तर तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याला कळवावे. शहरात वाहतूक पोलिसांचीही अशावेळी मदत घेता येऊ शकते.असा प्रसंग ओढवल्यास संबंधितांचे वर्णन व वाहनांचा क्रमांक लक्षात ठेवला पाहिजे. बँकेतून पैसे नेताना व्यवस्थित सांभाळून न्यावेत, कोणतीही व्यक्ती आपणाला काही खाण्यासाठी पदार्थ देत असेल, तर तो टाळावा, कोणत्याही व्यक्तीची आपण मदत मागितली नसताना, तो स्वत:हून आपणाला मदत करण्यास येत असल्यास सतर्कता बाळगावी.

Web Title: Beware if someone is arguing on the street for no reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.