सावधान, लिफ्टच्या बहाण्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:38+5:302021-02-25T04:19:38+5:30
जळगाव : दुचाकीस्वारांनो सावधान, अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणं पडले महागात... शहरात आठवडाभरात दोन ठिकाणी पादचारी नागरिकाला लिफ्ट दिल्यानंतर, त्या ...
जळगाव : दुचाकीस्वारांनो सावधान, अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणं पडले महागात... शहरात आठवडाभरात दोन ठिकाणी पादचारी नागरिकाला लिफ्ट दिल्यानंतर, त्या पादचारी नागरिकाने या दुचाकीस्वाराला धमकावत त्याच्याकडून पैसे लुटण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ने रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीने लिफ्ट मागितली, तर बऱ्याचदा माणुसकीच्या नात्याने दुचाकीस्वार लिफ्ट देतात. मात्र, जळगावातील दोन नागरिकांना अनोळख्या विशेषत : यामध्ये तरुण मुलांना लिफ्ट देणे चांगलेच महागात पडले आहे. यातील पहिल्या व्यक्तीने बाजारातून किराणा खरेदी करून घरी जात असतांना, त्यांना एका युवकाने लिफ्ट मागितली. त्यांनी लगेच गाडी थांबवून बसविले. मात्र, घरी आल्यावर त्यांना मागील खिशातील पाकीट व गाडीच्या मागे हॅगरला लावलेली पिशवी गायब झालेली दिसून आली. तसेच दुसऱ्या व्यक्तीने एका युवकाला अशीच लिफ्ट दिली असता, त्याने गाडीवर बसल्यावर थेट त्या दुचाकीस्वाराला धमकाविले आणि मारहाणदेखील केली. तसेच दुचाकी स्वाराला धमकावित दुसऱ्या ठिकाणी नेऊन, त्याच्याकडील पैसेही चोरून नेले. शहरात आठवडाभरात अशा दोन घटना घडल्यामुळे नागरिकांनी ओळखीच्या व्यक्तींनाच लिफ्ट देण्याचे आवाहन शिक्षणतज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी केले आहे.