भादली रेल्वे गेट भुयारी मार्ग येणार पूर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:09 AM2020-06-10T11:09:06+5:302020-06-10T11:09:16+5:30
रेल्वे विभाग : भुयारी बॉक्स लवकरच बसणार, पुढील तीन महिन्यात काम पूर्ण होण्याचा विश्वास
नशिराबाद : रेल्वे लाईन विस्तारीकरणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेला भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ चा मार्ग येत्या दोन-तीन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. हा रस्ता कायमस्वरूपी बंद होऊन शेतकऱ्यांना फेºयाच्या मार्गाने देण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधाची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन त्याठिकाणी पर्यायी भुयारी मार्ग देण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड-दोन वर्षांपासून हे काम सुरू असून आता आॅगस्ट अखेरपर्यंत हे काम पूर्णत्वास येणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
रेल्वे लाईन विस्तारीकरणामुळे भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ चा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचाली गत कालखंडात गतिमान झाल्या होत्या यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘भादली रेल्वे गेट बंद झाल्यास शेतकºयांनी शेतात जायचे कसे? ’या मथळ्याखाली शेतकºयांची कैफियत मांडून उहापोह केला होता. शेतकºयांच्या समस्या रेल्वे प्रशासनासमोर मांडल्या होत्या. हा रस्ता बंद झाल्यास शेकडो एकर जमिनीवर शेतकºयांना पाणी फिरावे लागणार होते. मात्र रेल्वे प्रशासनाने याबाबत दखल घेवून पर्यायी मार्ग दिला होता. मात्र या शेतकºयांना सुमारे दहा किलोमीटर अंतराचा फेरा करून शेतात जावे लागणार होते. त्यामुळे शेतकºयांनी पुन्हा त्याला विरोध केला होता. आहे त्याच जागेवरून भुयारी मार्ग व्हावा, पर्यायी रस्ता नको, यासाठी शेतकºयांनी आंदोलन केले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, योगेश पाटील यांच्यासह शेतकºयांनी आंदोलनाचे त्यावेळी नेतृत्व केले होते.
रेल्वे प्रशासनाने शेतकºयांची भूमिका व समस्यांची दखल घेऊन आहे त्याच जागेवरूनच भुयारी मार्ग करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे शेतकºयांनी आंदोलन स्थगित करून आनंद व्यक्त केला होता.
गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे. अजून किती दिवस लांबच्या मार्गाने शेतकºयांना शेतात जावे लागणार या विवंचनेत शेतकरीराजा आहे. दरम्यान, यासंदर्भात मार्च २०२०पर्यंत हा रस्ता पूर्णत्वास येवून भुयारी मार्ग खुला करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ललित बºहाटे यांनी माहितीच्या अधिकारात रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत काम पूर्णत्वास न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पर्यायी रस्त्याने शेतकºयांना सध्या ये-जा करावी लागत आहे. भुयारी मार्ग लवकर खुला झाल्यास शेतकºयांना सोयीचे होणार आहे.
२२ बॉक्स तयार
दरम्यान, भादली रेल्वे स्टेशन परिसरात एल. एच. एस. भुयारी मार्गासाठी सुमारे बावीस बॉक्स तयार करण्यात आले आहे. भुयारी मार्गासाठीची सुमारे ६० टक्के काम पूर्णत्वास आले असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.
रेल्वे गेट बंद असले तरी शेतकºयांसाठी पर्यायी मार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. रेल्वे गेट क्रमांक १५३ या ठिकाणावरून भुयारी मार्ग देण्याचे काम गतीशील असून येत्या अडीच ते तीन महिन्यात काम पूर्णत्वास येऊन भुयारी मार्ग कार्यान्वित होणार आहे. सुमारे साठ टक्के काम पूर्णत्वास आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये एल एच एस भुयारी बॉक्स टाकण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई येथून मोठी क्रेन आणावी लागणार आहे. रेल्वे रोड क्रेन येणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरु आहे.
- रोहित थावर,
भुसावळ रेल्वे विभाग उप मुख्य अभियंता (निर्माण).