भादली रेल्वे गेट अंडर बायपास कामाला तातडीने गती मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:12 AM2021-01-09T04:12:51+5:302021-01-09T04:12:51+5:30
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८ या रस्त्याला असलेले रेल्वे गेट क्रमांक १५३ जवळ तिसऱ्या व चौथ्या ...
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८ या रस्त्याला असलेले रेल्वे गेट क्रमांक १५३ जवळ तिसऱ्या व चौथ्या रेल्वेलाइनच्या विस्तारीकरणामुळे रेल्वे विभागाकडून रेल्वे गेट नं १५३ कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहे. परिणामी लोकप्रतिनिधी व स्थानिक शेतकरी यांनी प्रशासनाकडे प्र.जि.मा.क्र.१८ वरील वाहतूक तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल वारंवार पाठपुरावा केला. त्या आनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून अवजड वाहनांसाठी रेल्वे गेट नं १५२ ते १५३ समांतर रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे व छोट्या वाहनांसाठी रेल्वे गेट नं १५३च्या जागी रेल्वे अंडर बायपास मंजूर केला असून, त्यासाठी लागणारे एलएचएस बॉक्स जागेवर तयार केले आहेत. मात्र सध्या कामाची गती नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, तत्कालीन उपमुख्य अभियंता (निर्माण) यांनी सदर रेल्वे अंडर बायपासचे काम मार्च २०२०पर्यंत पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे लिखित व तोंडी स्वरूपात गत काही कालखंडात वारंवार आश्वासने दिली गेली आहे. परंतु अंडरपास संदर्भात आजमितीस कुठलेही काम प्रत्यक्ष सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना व परिसरातील नागरिकांना ६ ते ८ कि.मी.च्या फेऱ्याने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. तरी या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रेल्वे अंडर बायपासचे काम लवकरात लवकर करून सहकार्य करावे, अशी मागणी जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी निवेदनातून केली आहे.