भडगाव शहर झाले हगणदरी मुक्त
By admin | Published: June 5, 2017 05:57 PM2017-06-05T17:57:59+5:302017-06-05T17:57:59+5:30
1 कोटी मिळणार : केंद्रीय समितीची घोषणा
Next
ऑनलाईन लोकमत
भडगाव,दि.5 : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत केंद्रीय समितीने भडगाव शहर हगणदारीमुक्त घोषित केले आहे. याबद्दल विकास कामांसाठी सरकारकडून 1 कोटी मिळणार आहे. 2 जून रोजी केंद्रीय समितीकडून पाहणी झाली होती. 4 जून रोजी नगरपरिषदेस मिळाला असून त्यांनी भडगाव शहर हगणदरी मुक्त घोषित केले आहे.
भडगाव न.पा.ने शहर हगणदरी मुक्तचा ठराव करुन प्रस्ताव पाठवला होता. यानुसार जिल्हास्तरीय प्राथमिक तपासणी 27 एप्रिल 2017 रोजी करण्यात आली. या समितीचा अहवाल समाधानकारक मिळाला. यानुसार 24 व 25 मे 2017 रोजी राज्यस्तरीय समितीकडून पाहणी करण्यात आली. या समितीने देखील भडगाव शहर हगणदरीमुक्तची शिफारस केली होती. यानंतर 2 जून रोजी दिल्ली येथील केंद्रीय समिती पथक शहरात दाखल झाले. पथकाने पेठ, टोणगाव, यशवंतनगर, गिरणा नदीपात्र आदी भागात तसेच जि.प. मराठी शाळा क्र.1 व लाडकूबाई माध्य. विद्यालय परिसरासही भेट दिली व पाहणी केली. न.पा.ने केलेल्या सर्व कामांची व सर्व हगणदरमुक्त ठिकाणांची व सार्वजनिक ठिकाणांची देखील पाहणी केली. नगराध्यक्ष शामकांत भोसले, नगरसेवक सुभाष पाटील, नगरसेविका योजना पाटील, प्राजक्ता देशमुख, सुवर्णा पाटील, कमलबाई अहिरे आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी बबन तडवी, न. पा. अभियंता रणजित पाटील, लिपिक नितीन पाटील, विशाल महाजन, कमलाकर देशमुख हे समिती सोबत होते.