भाग्यश्री, वैभव आणि इंद्रजीत आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:46 AM2021-02-20T04:46:40+5:302021-02-20T04:46:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवजयंतीनिमित्त लोकसंघर्ष मोर्चाने आयोजित केलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या दिवशी पाचव्या फेरीअखेर जळगावची भाग्यश्री ...

Bhagyashree, Vaibhav and Inderjit in the lead | भाग्यश्री, वैभव आणि इंद्रजीत आघाडीवर

भाग्यश्री, वैभव आणि इंद्रजीत आघाडीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिवजयंतीनिमित्त लोकसंघर्ष मोर्चाने आयोजित केलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या दिवशी पाचव्या फेरीअखेर जळगावची भाग्यश्री पाटील, नंदूरबारचा वैभव बोरसे आणि औरंगाबादच्या इंद्रजीत महिंद्रकर यांनी प्रत्येकी पाच गुण मिळवत आघाडी घेतली आहे. या स्पर्धेत ८३ खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने घेण्यात आली आहे. स्पर्धेचे उरलेल्या चार फेऱ्या शनिवारी घेण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन पालक मंत्री गुलाबराव पाटील व लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापिका प्रतिभा शिंदे यांनी लेवा भवनात शुक्रवारी सकाळी प्रत्यक्ष पटलावर चाल करून उद्घाटन केले.

यावेळी सचिन धांडे,आयएमआयचे अध्यक्ष स्नेहल फेगडे, ॲड. विजय पाटील, श्रीराम पाटील, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, प्रवीण ठाकरे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अंकुश रक्ताळे ,विजय देसाई ,चंदन कोल्हे, अमोल कोल्हे, मुकुंद सपकाळे, वासुदेव पाटील, गजानन देशमुख, विनोद देशमुख, भुषण पाटील, प्रमोद पाटील, निर्णय चौधरी, सागर पाटील, दामोदर भारंबे, सुभाष जाधव ,योगेश पाटील, प्रतीक जोशी व प्रणव पवार उपस्थित होते.

पाचव्या फेरीअखेरपर्यंत पाच पैकी पाच गुण जळगावची भाग्यश्री पाटील नंदुरबारचे वैभव बोरसे, औरंगाबादचे इंद्रजीत महिंद्रकर,घेऊन आघाडीवर आहेत तर तर स्पर्धेत चार गुण मिळून सानिया तडवी, केतन पाटील, रविंद्र दशपुत्रे ,वैभव बडगुजर, अक्षय सावदेकर, पूर्वा जोशी,गुणवंत कासार , चोपडा चे सदानंद तोटे , नंदुरबार चा ऋषिकेश सोनार, भुसावळ चा रियाझ तडवी यांनी आपले स्थान राखले आहेत.

मानांकित खेळाडूंचा धक्कादायक पराभव

जळगावचा फिडे रेटेड आणि अनुभवी खेळाडू भरत आमले याला नऊ वर्षाच्या तहेसीन हिने दुसऱ्या फेरीत तर तिची बहिण सानिया तडवी हिने पाचव्या फेरीत पराभूत केले. बिगर मानांकित देवेश याने मानांकित प्रशांत कासारला पराभूत केले. पंच म्हणून परेश देशपांडे, अंकुश रक्ताळे, कुमारी शर्वरी दशपुत्रे , आकाश धनगर व पवन धनगर यांनी काम पाहिले.

फोटो - २२ सीटीआर १० - ६४ घरांच्या पटलावर चाल करताना खेळाडू.

Web Title: Bhagyashree, Vaibhav and Inderjit in the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.