बंडातात्या कराडकर सुटकेसाठी भजन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:07+5:302021-07-19T04:12:07+5:30
विश्व हिंदू परिषदेंतर्गत बजरंग दल व वारकरी संप्रदायातर्फे भजन व दिंडीच्या स्वरूपात वारी काढून आंदोलन करण्यात आले. ही वारी ...
विश्व हिंदू परिषदेंतर्गत बजरंग दल व वारकरी संप्रदायातर्फे भजन व दिंडीच्या स्वरूपात वारी काढून आंदोलन करण्यात आले. ही वारी शनिवारी सकाळी ९ वाजता श्री त्रिविक्रम महाराज मंदिरापासून सुरू होऊन गांधी चौक- अग्रसेन चौक- पहूर दरवाजा- बसस्थानक- शेवट पोलीस स्टेशन या क्रमाने काढण्यात आली.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक विहिंप प्रखंडमंत्री अतुल पाटील यांनी केले. त्यानंतर हभप प्रल्हाद महाराज यांनी मार्गदर्शन केले, नंतर पोलीस अधिकारी म्हणून पाेलीस उपनिरीक्षक अमोल देवडे यांना निवेदन देण्यात आले. सोबत ठाणे अंमलदार शशिकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गजानन ढाकणे उपस्थित होते. निवेदन देताना विहिंप प्रांत कार्यकारिणी सदस्य वामन फासे, विहिंप जिल्हा सहमंत्री भिकाभाऊ इंदरकर, प्रखंड संयोजक भूषण दामधर, हभप कडोबा महाराज, हभप प्रल्हाद महाराज, हभप कन्हैया महाराज, हभप रघू महाराज उपस्थित होते.