ख्वॉजामिया झोपडपट्टी जागेत भाजीबाजार
By admin | Published: February 28, 2017 12:06 AM2017-02-28T00:06:42+5:302017-02-28T00:06:42+5:30
महासभेत आज होणार निर्णय : ..तर एकतृतीयांश जागेवर करणार पे अॅण्ड पार्कची सोय
जळगाव : ख्वॉजामिया झोपङपट्टीच्या सिटी सर्व्हे नं.८२९४ या जागेवर दोन तृतीयांश जागेत म्हणजेच ६७४७ चौ.मी. जागेवर तात्पुरता भाजीबाजार बसविण्याचा व उर्वरीत एक तृतीयांश म्हणजेच ३३७६ चौ.मी. जागेत पे अॅण्ड पार्क तत्वावर पार्र्कींग विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे. त्यावर मंगळवारी महासभेत निर्णय होणार आहे.
मनपाकडून रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाºया विक्रेत्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्बंध आणण्यात आले असून त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागेवर स्थलांतरीत करणे आवश्यक आहे.
मात्र मनपाने दिलेल्या पर्यायी जागा या विक्रेत्यांकङून नाकारण्यात आल्याने स्थलांतर रखडले आहे. मनपाच्या ख्वॉजामिया झोपङपट्टीच्या सिटी सर्व्हे नं.८२९४ या जागेवर व्यापारी संकुल व पार्र्कींग बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी अंगीरा बिल्डकॉनशी करारनामाही करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आलेल्या ठराव विखंडनाबाबतच्या तक्रारीवर शासनाने जागा हस्तांतरणास स्थगिती दिली होती.
ही स्थगिती २ एप्रिल २०१४ रोजी उठविली. त्यानंतर मनपाने हा विकासक प्रस्ताव रद्द केला. तो ठराव विखंङनाची मागणी विकासकाने केलेली मागणी शासनाने फेटाळल्याने विकासकाने न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र या दाव्यात न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही.
त्यामुळे मनपा प्रशासनाने या जागेवर भाजीपाला विक्रेत्यांना तात्पुरती जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.
काय आहे प्रस्ताव?
प्रस्तावानुसार ६७४७ चौ.मी. जागेवर आर्किटेक्टकडून आवश्यक तो आराखडा तयार करून प्रत्येक विक्रेत्याला २ बाय दीड मीटर मापाची जागा भाडेतत्वावर आवश्यक त्या अटी व शर्तीचा करारनामा करून द्यावा. तसेच उर्वरीत ३३७६ चौ.मी. जागेवर रिंगरोड व गणेश कॉलनी रस्त्यालगत पे अॅण्ड पार्क या तत्वावर जागा विकासकास देण्याचा. तसेच भाजीपाला विक्रेत्यांसाठी तयार होणाºया आराखड्यानुसार ही जागा विकसित करून मनपामार्फत किंवा भाडेवसुलीसाठी विकासकास मक्ता देण्याचे प्रस्तावित आहे.