विदेशात जाणा-यांच्या मदतीला धावून येतोय "भरत"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:16 AM2021-04-24T04:16:23+5:302021-04-24T04:16:23+5:30
आंतरराष्ट्रीय स्वॅब कलेक्शन दूत अशी ओळख : लॅबमध्ये केरळ, आसाममधील तज्ज्ञांची टिम लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव ...
आंतरराष्ट्रीय स्वॅब कलेक्शन दूत अशी ओळख : लॅबमध्ये केरळ, आसाममधील तज्ज्ञांची टिम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव : विदेशात जाण्यासाठी सद्यस्थितीला आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असणे सक्तीचे आहे. खान्देशात डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय आरटीपीसीआर लॅब ही एकमेव मानांकित आहे. विदेशात जाणार्या नागरिकांच्या मदतीला धावून जाणार्या भरत'' ने आतंरराष्ट्रीय स्वॅब कलेक्शन दूत म्हणून ओळख निर्माण केली आहे.
भारतीय विमानतळावर केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच खान्देशातील डॉ.उल्हास पाटील आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल ग्राह्य धरला जात आहे. पाटील आरटीपीसीआर लॅब ही अवघ्या २४ तासातच अहवाल उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे भरत हा आंतरराष्ट्रीय स्वॅब कलेक्शन दूत ठरत आहे. या लॅबमध्ये प्रमुख म्हणून डॉ.कैलास वाघ, डॉ.विपीन तोडसे, डॉ.शिरीश गोंदाणे, विठ्ठल शिंदे, डॉ.हेमंत पाटील, अमोल चौधरी, प्रांजल पाटील, आफताब दानिश मोहम्मद आसिफ, पठाण नयीम हसन खान यांच्यासह लॅबमध्ये खास केरळहून प्रशांतकुमार गुड्टी तर आसामहून बिट्टोपन दास यांना पाचारण केले आहे. (वा.प्र.)