भरतनाट्यमची शहरास ओळख दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:07 PM2019-03-08T12:07:48+5:302019-03-08T12:07:55+5:30
-नेहा जोशी
नृत्याची प्रारंभापासून आवड होती. त्यामुळे गुरू शरद पंड्या यांच्या मार्गदर्शनात पूर्वा स्कूल आॅफ भरतनाट्यम या संस्थेतून ७ वर्ष भरतनाट्यमचे शिक्षण घेतले. विवाह झाल्यानंतर जळगावात भरतनाट्यम या नृत्याविषयी बरीच मोठी पोकळी जाणवली. मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलांचे संगोपन व शिक्षण यामुळे काही वर्ष या क्षेत्रापासून दूर रहावे लागले. पाच वर्षांपूर्वी २०१३ मध्ये जुलै महिन्यात आपले गुरू शरद पंड्या यांच्या उपस्थितीत त्यांच्या पूर्वा स्कूल आॅफ भरतनाट्यम समवेत संलग्न असलेल्या मुद्रा स्कूल आॅफ भरतनाट्यम या संस्थेची खान्देशात मुहूर्तमेढ केली.
भरत नाट्यमविषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावी म्हणून विविध शाळा, कॉलेजमध्ये जाऊन सादरीकरणासह जनजागृती केली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास मंदिर या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत नृत्य प्रशिक्षण देते. भरतनाट्यमचा प्रचार-प्रसार असो की मुद्राचे संचालन असो कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता हे व्रत सुरू ठेवले आहे.
‘लोकमत’ कार्यक्रमांमधून संधी
लोकमत आयोजित सुप्रसिद्ध नृत्यांगनांचे नृत्य फेम सुधाचंद्रन यांच्या कार्यक्रमाची २०११ मध्ये आपण नवग्रह स्तोत्रावर आधारीत नृत्याने सुरुवात केली होती. लोकमतने वेळोवेळी आपणास व्यासपीठ उपलब्ध करून दिले याचा आनंद आहे. ५ वर्षापूर्वी सुरू झालेल्या मुद्रा स्कूल आॅफ भरतनाट्यम या संस्थेने अल्पावधीतच आपला स्वत:चा एक वेगळा ठसा उमटविला आहे. १० विद्यार्थिनींनी सुरू झालेल्या या संस्थेत ८५ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. भरतनाट्यमचा या माध्यमातून प्रसार होत असल्याचे समाधान आहे. दरवर्षी विद्यार्थिनींच्या प्रशिक्षणाविषयी माहिती देणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मुद्राच्या विद्यार्थिनींसाठी आजपर्यंत २५ वर्कशॉप आयोजित केले असून त्यात विविध तज्ज्ञ मान्यवरांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले आहे. मुद्राच्या माध्यमातून संस्थेच्या वाटचालीच्या तिसºयाच वर्षी आंतरराष्टÑीय नृत्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. यंदा २०१९ मध्ये देखील मुद्राच्या माध्यमातू नृत्य महोत्सव होईल.
-नेहा जोशी, नृत्य क्षेत्र