भावांजली महोत्सवाची सुरुवात बुधवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:31 AM2020-12-13T04:31:42+5:302020-12-13T04:31:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : परिवर्तनने आयोजित केलेल्या भावांजली महोत्सवाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता दि.१६ डिसेंबर रोजी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : परिवर्तनने आयोजित केलेल्या भावांजली महोत्सवाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता दि.१६ डिसेंबर रोजी सायंकाळी या पाच दिवसीय महोत्सवाला सुरुवात केली आहे. स्व. भवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. असे असले तरी शनिवारी स्व. भवरलाल जैन यांची जयंती असल्याने संजय सोनवणे व २६ बासरी कलावंतांनी ‘ देश’ राग वाजवून भाऊंना स्वरांजली दिली.
याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन,अनिष शहा, अमर कुकरेजा, अनिल कांकरिया, नारायण बाविस्कर, आनंद मलारा, परिवर्तनच्या मंजूषा भिडे, विनोद पाटील, विशाल कुलकर्णी, हर्षल पाटील, प्रतीक्षा कल्पराज, श्रद्धा कुलकर्णी, राहुल निंबाळकर, सुदीप्ता सरकार, मंगेश कुलकर्णी, हर्षदा कोल्हटकर, अनुषा महाजन आदी उपस्थित होते.