बासुरीच्या सुराने भावांजली महोत्सवाला सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:09+5:302020-12-17T04:42:09+5:30
संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन आयोजित भाऊंना भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी भाऊंच्या उद्यानात मान्यवरांनी बासरी वाजवून अनोख्या ...
संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन आयोजित भाऊंना भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी भाऊंच्या उद्यानात मान्यवरांनी बासरी वाजवून अनोख्या पद्धतीने केले. यावेळी व्यासपीठावर केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, उद्योजक श्रीराम पाटील, श्रीराम खटोड, नंदू अडवाणी, नाट्यकर्मी संदिप घोरपडे , राहुल निंबाळकर, नंदलाल घाटीया उपस्थित होते.
२० डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरवात वेणुत्सवाने झाली. वेणुत्सवात संजय सोनवणे व २० बासरी कलावंतांनी भाऊंच्या आवडीचे वैष्णव जन, खमास राग, पहाडी धून, ना.धों महानोरांची गाणी, भैरवी सादर केली. बासरीच्या सुरांनी भाऊंच्या उद्यानातील वातावरण रमणीय झाले होतं. शास्त्रीय व उपशास्त्रीय सादरीकरणाबरोबर बासरीच्या सुरातून गाणी ऐकतांना रसिक तल्लीन झाले होते.महोत्सव प्रमुख आनंद मलारा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रंगमंचावर महोत्सवाचे प्रमुख अमर कुकरेजा, किरण बच्छाव व नारायण बाविस्कर, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ अभिनेत्री मंजुषा भिडे यांनी केले.