‘भावांतर’ने धान्य उत्पादकांना भरपाई, ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:15 PM2018-03-15T12:15:06+5:302018-03-15T12:15:06+5:30

मध्यप्रदेशातील वाढीव हमी भावामुळे भाव वाढण्याची शक्यता

'Bhavantar' compensates the grain growers, only the customers' appetite | ‘भावांतर’ने धान्य उत्पादकांना भरपाई, ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ

‘भावांतर’ने धान्य उत्पादकांना भरपाई, ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ

Next
ठळक मुद्देजळगाव धान्य बाजारतही जाणवणार परिणामपावती शिवाय फरकाची रक्कमही शेतक-यास मिळणार नाही

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १५ - धान्य तसेच कडधान्यास सरकारकडून जाहीर झालेला हमी भाव खरेदीदारांनी न दिल्यास त्यामध्ये असलेल्या फरकाची रक्कम आता सरकारच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. मध्यप्रदेश सरकारने ‘भावांतर’ नावाची ही योजना सुरू केली असून यंदा जादा हमी भावदेखील जाहीर केल्याने गव्हाचे भाव वाढून त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही होणार असल्याचे संकेत व्यापा-यांनी दिले आहे. या योजनेमुळे धान्य उत्पादक शेतक-यांना दिलासा तर मिळणार आहे, मात्र ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
कृषी पिकासाठी सरकार हमी भाव जाहीर करते, मात्र प्रत्यक्षात शेतकºयास जाहीर झालेला भाव मिळत नसल्याचे बºयाच वेळा दिसून येते. त्यामुळे शेतकरी हमी भावापासून वंचित राहत असतो. यासाठी मध्यप्रदेश सरकारने धान्यासाठी ‘भावांतर’ योजना सुरू करून शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतक-यांच्या खात्यात होणार फरक जमा
गव्हाचे मोठे उत्पादन व जळगाव जिल्ह्यातही गव्हाचा पुरवठा करणाºया मध्यप्रदेशात सरकार गव्हाला दोन हजार रुपये हमी भाव देत आहे. हा भाव जाहीर झाल्यानंतर शेतकºयांनी त्यांचा माल विक्रीसाठी नेला असता तेथे गव्हाला दोन हजार रुपये भाव न मिळता केवळ १८०० रुपयेच भाव दिला तर यातील २०० रुपयांची फरकाची रक्कम सरकार संबंधित शेतकºयाच्या खात्यात जमा करणार आहे. मात्र यासाठी ज्या भावात माल विकला त्यांची पावती व सातबारा उतारा शेतकºयांस सादर करावा लागणार आहे. हमी भावापेक्षा जास्त भावाने विक्री झाली तर त्यावर सरकारचा काहीच आक्षेप राहणार नाही, हे विशेष.
जळगाव जिल्ह्यात परिणाम
महाराष्ट्रात गव्हाला प्रति क्विंटल १७३५ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. मात्र महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने जळगाव जिल्ह्यात बहुतांश गहू हा मध्यप्रदेशातून येत असतो. त्यामुळे मध्यप्रदेशातील या योजनेचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही जाणवणार असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेश सरकार हमी भावच दोन हजार रुपये देत असल्याने व्यापारी त्या भावात खरेदी करतील तर साहजिकच किरकोळ बाजारात यंदा गव्हाचे भाव वाढण्याचे संकेत दिले जात आहे. सध्या जळगावच्या बाजारात जुन्या गव्हाचे भाव २००० ते २१०० रुपये आहेत, मात्र आता मध्यप्रदेशातील नवीन मालाची आवक वाढल्यानंतर यामध्ये वाढ होणार असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
....तर शेतक-यांना पावत्या मिळणार नाही
गव्हाचा दर्जा, बाजारात असलेले कमी भाव यामुळे व्यापाºयांना हमी भावात गव्हाची खरेदी करणे परवडणार नसल्याने ते त्या भावात माल घेणार नाही. तसेच हमी भावापेक्षा कमी भावात माल खरेदी केला तर कारवाईची भीती राहणार किंवा कमी भावात माल घेतला तरी त्याच्या पावत्या व्यापारी शेतकºयांना देणार नाही, अशीही शक्यता या योजनेमुळे आहे. परिणामी पावती शिवाय फरकाची रक्कमही शेतक-यास मिळणार नाही, असे जानकारांनी सांगितले.

जळगावच्या बाजारपेठेत मध्यप्रदेशातून गव्हाची जास्त आवक असते. तेथे हमी भाव वाढवून देण्यासह ‘भावांतर’ योजना सुरू केल्याने त्याचा परिणाम होऊन गव्हाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन

Web Title: 'Bhavantar' compensates the grain growers, only the customers' appetite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.