भवरलाल जैन यांची तिसरी पिढी उद्योगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:48 PM2018-12-15T12:48:45+5:302018-12-15T12:49:02+5:30

- विजयकुमार सैतवाल ऋषभदेवांनी दिलेली कृषिसंस्कृती कृतिशीलपणे आचरणात आणणाऱ्या भवरलाल जैन यांची शेतीमातीशी असणारी निष्ठा सर्वश्रुत आहे. कृषी संस्कृतीचा ...

Bhavarlal Jain's third generation in the industry | भवरलाल जैन यांची तिसरी पिढी उद्योगात

भवरलाल जैन यांची तिसरी पिढी उद्योगात

googlenewsNext

- विजयकुमार सैतवाल
ऋषभदेवांनी दिलेली कृषिसंस्कृती कृतिशीलपणे आचरणात आणणाऱ्या भवरलाल जैन यांची शेतीमातीशी असणारी निष्ठा सर्वश्रुत आहे. कृषी संस्कृतीचा वसा त्यांनी घेतला. हा वसा त्यांची पुढची पिढी समर्थपणे चालवित आहेत. सुपुत्र अशोक, अनिल, अजित व अतुल हे भवरलाल जैन यांनी संस्कारित केलेल्या कार्यसंस्कृतीनुसार या समूहाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. भवरलाल जैन यांच्या सहवासात संस्कारित झालेली नातवंडे तिसरी पिढीही प्रेरणा घेत आहे. बालपणापासूनच आपले आजोबा, वडील व काकांची धडपड तिसºया पिढीने पाहिलेली आहे.
मायमातीसाठी प्रामाणिकपणे आयुष्यभर कठोर परिश्रम करणारे भवरलाल जैन यांनी शेती, शेतकरी व पाणी या तीन गोष्टींवर आपले लक्ष्य केंद्रीत केले. १८९७ मध्ये राजस्थानातील मारवाड- आगोळाई येथून पाण्याच्या शोधात हिरालाल जैन यांचे आजोबा जवाहरमल जैन स्थलांतरीत होऊन अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या वाकोद येथे आले व तेथेच ते स्थिरावले. पूर्वजांकडून कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि जिद्द ही परंपरा कायम ठेवत पाण्याचे मोल भवरलाल जैन यांनी जाणले होते. ‘जल हेच जीवन आणि जीवन हेच जल’ हाच ध्यास त्यांना लागला होता. त्याच कळकळीतून त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन-संवर्धन केले. पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा त्या दृष्टीने जे काही करता येईल ते सर्व त्यांनी केले. तोच संस्कार आपल्या सहकाºयांनाही त्यांनी दिला. आईचा शब्द भाऊंनी जीव की प्राण मानल्यामुळे पिकपाण्याशी रुजलेले नाते वैश्विक पातळीवर केव्हा पोहोचले ते कळलेच नाही.
जगातल्या शेती आणि शेती करण्याच्या अभ्यासानंतर भारतीय शेतीप्रणालीत ठिबक सिंचन कसे रुजविता येईल, त्या दृष्टीने आवश्यक ते बदल त्यांनी केले आणि शेतकºयांना जल बचतीचा शाश्वत मंत्र ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी दिला. त्यामुळे ‘ठिबक सिंचनाचे प्रणेते’ असलेल्या या जलसाधकाने कृषिक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा निर्माण केला.
भवरलाल जैन यांनी २५ फेब्रुवारी २०१६ ला अखेरचा श्वास घेतला. कृषी संस्कृतीचा वसा चालविणारे भवरलाल जैन यांच्या पुढच्या पिढीनेही आपले कर्तृत्व सिद्ध केले. संपूर्ण जगभरात भारतासह एकूण ३३ कारखाने, १२६ हून देशांमध्ये २७०० वितरक विदेशात, भारतातील ७५०० वितरकांच्या माध्यमातून जैन इरिगेशनने निर्माण केलेली विविध उत्पादने वितरीत होत आहेत.

अशोक जैन
भवरलाल जैन यांचे ज्येष्ठ पुत्र अशोक जैन. त्यांनी जळगावच्या एम.जे. कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. ते १९८३ पासून कंपनीत कार्यरत झाले. आज ते कंपनीचे अध्यक्ष आहेत.
अनिल जैन
भवरलाल जैन यांचे व्दितीय पुत्र अनिल जैन यांनी आपले मोठेभाऊ अशोक जैन यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. ते १९८४ पासून कंपनीत कार्यरत झाले. ते उपाध्यक्ष असून निर्यात, विदेशातील कंपन्यांचे काम, कंपन्यांचे अधिग्रहण, विस्तार अशा अनेक बाबी ते सांभाळतात.
अजित जैन
भवरलाल जैन यांचे तिसरे पुत्र अजित जैन यांनी तांत्रिक शाखेला प्राधान्य दिले. पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ई (मेकॅनिक) पदवी संपादन केली. ते १९८५ पासून कंपनीत कार्यरत झाले. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक ही जबाबदारी ते यशस्वी पार पाडत आहेत. अचूक निर्णयक्षमता, अखंड कार्यमग्नता हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
अतुल जैन
भवरलाल जैन यांचे चौथे पुत्र अतुल जैन यांनी पुणे येथे शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य विभागातील पदवी संपादन केली. ते १९९२ पासून कंपनीत कार्यरत झाले. कंपनीच्या विविध उत्पादनांच्या विपणन व्यवस्थेत त्यांचे मोलाचे योगदान आहे. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक ही जबाबदारी ते यशस्वी पार पाडत आहेत.
अथांग अनिल जैन
भवरलाल जैन यांचे नातू व अनिल जैन यांचा मोठा मुलगा अथांग जैन यांनी लंडन स्कूल आॅफ इकोनॉमिक्सची पदव्युत्तर शिक्षण २०१३ मध्ये पूर्ण केले. जैन इरिगेशनची उप कंपनी जैन फार्मफ्रेश फुडस् लि.चे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून फ्रूट टू गो, फ्रोजन आमरस, जामून, स्ट्रॉबेरी, डिहायड्रेड आॅनियन (रेड एण्ड व्हाईट), व्हॅली स्पाईस हे नवीन उत्पादन बाजारात आणले गेले. आता व्हॅली स्पाईस मसाले उद्यागाची जबाबदारी देखील अथांग पार पाडत आहेत.
अमोली अनिल जैन
अनिल जैन व अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांची कन्या अमोली जैन यांनी लंडन स्कूल आॅफ इकोनॉमिक्स येथून २०१७ मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. कंपनीत ट्रेनी म्हणून त्यांनी अनुभव घेतला. आता जैन इरिगेशनची उप कंपनी जैन फार्मफ्रेश फुडस् लि.च्या रिटेलर डिव्हीजनची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
अभेद्य अजित जैन
अजित जैन यांचा मोठा मुलगा अभेद्य जैन यांनी अलिकडेच किंग्ज कॉलेज लंडन येथे मास्टर इन इंटरनॅशनल माकेर्टींग पदवी मिळविली. ते ट्रेनी म्हणून कंपनीत कार्यरत आहेत.

Web Title: Bhavarlal Jain's third generation in the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव