भवरलालजींचे सूक्ष्म सिंचनासाठीचे योगदान ‘नोबेल’ पुरस्काराच्या तोडीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:20 AM2017-10-17T01:20:55+5:302017-10-17T01:22:44+5:30
राज्यपालांचे गौरवोद्गार : अशोक जैन यांनी स्वीकारला ‘परमार्थ रत्न’ पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचे सूक्ष्म सिंचनासाठीचे योगदान ‘नोबेल’ पुरस्काराच्या तोडीचे आहे. भवरलालजींनी ग्रामीण भारतात उच्च कृषी तंत्रज्ञान व मायक्र ो इरिगेशनद्वारे (सूक्ष्म सिंचन) लाखो अल्पभूधारक शेतकºयांना समृद्ध केले. त्यामुळे त्यांचे योगदान नक्कीच नोबेल पुरस्काराच्या तोडीचे आहे असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले..
मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे रविवारी परमार्थ सेवा समितीतर्फे दिवंगत भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्याचा ‘परमार्थ रत्न’ सन्मानाने गौरव करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव व न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अत्यंत साधी जीवनशैली आयुष्यभर अंगीकारून सामान्यातून असामान्य कार्य त्यांनी निर्माण केले. केवळ ७ हजार रुपये भांडवलावर त्यांनी चार दशकांनंतर जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारी बहुराष्ट्रीय कंपनी नावरु पास आणली, असेही राज्यपाल म्हणाले.
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सोहळ््यास संघपती दलूभाऊ जैन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कल्पतरु चे अध्यक्ष मोफतराज मुणोत, सुप्रिमचे अध्यक्ष महावीर तापडीया, पिरामल गृपचे दिलीप पिरामल, बिझनेस इंडियाचे अशोक अडवानी, बीग बाजारचे अध्यक्ष किशोर बियाणी, आयडीबीआयचे कार्यकारी संचालक अभय बोंगीरवार, परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियाणी आदी उपस्थित होते.
गांधी विचारांवर नितांत श्रद्धा
लोकसहभागावर त्यांचा अधिक विश्वास होता. गांधी विचारांवर श्रद्धा ठेवत विश्वस्ताच्या भूमिकेतून उद्योगाला आकार देणाºया उद्योगपतींमध्ये जमनालाल बजाज यांच्यानंतर त्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल, असे ज्येष्ठ गांधीवादी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले.
भाऊंच्या आठवणींनी आज आमचे मन भरुन आले असून अवघ्या ७९ वर्षांच्या आयुष्यात जगातील १२० देशात आपल्या व्यवसायाचा विस्तार त्यांनी साध्य केला. शेतकºयांसाठी कृषी उद्योगाला आकार दिला. वैश्विक विस्तार साध्य करुनही त्यांनी मुख्यालय जळगावलाच ठेवल्याचे अनिल जैन यांनी आवर्जून सांगितले.