जळगावनजीक अपघातात भोकरदनचे दोन ठार
By admin | Published: April 6, 2017 12:32 AM2017-04-06T00:32:51+5:302017-04-06T00:32:51+5:30
पहूर : मक्याचे पेमेंट घेण्यासाठी येत होते
जळगाव : झाड अंगावर कोसळल्याने सरपंचासह दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना पहूरनजीक बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर विश्वनाथ लक्कस (वय ४१) व ज्ञानेश्वर दादाराव लक्कस (वय ३८ दोन्ही रा. पारध खुर्द, ता. भोकरदन, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत. ज्ञानेश्वर दादाराव लक्कस हे पारध खुर्द गावाचे विद्यमान सरपंच होते.
सूत्रांनुसार, ज्ञानेश्वर विश्वनाथ व ज्ञानेश्वर दादाराव लक्कस हे दोन्ही जण मक्याचे पेमेंट घेण्यासाठी मोटारसायकलने (क्र. एमएच-२८-एआर-१०१४) जळगावकडे येत होते. पहूर गाव ओलांडल्यानंतर तीन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेले झाड या दोघांच्या अंगावर कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. पहूर व पाळधी येथील नागरिकांनी या दोघांना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविले. तिथे वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले.
(वार्ताहर)