जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बंदचा दालमिल चालकांना भूर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:17 PM2019-06-29T12:17:02+5:302019-06-29T12:17:31+5:30

बाहेरील जिल्ह्यातून आणावा लागतोय कच्चा माल

Bholandund to the junk drivers of Jalgaon Agricultural Produce Market Committee | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बंदचा दालमिल चालकांना भूर्दंड

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बंदचा दालमिल चालकांना भूर्दंड

Next

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे धान्यासह कडधान्याचीही आवक बंद असल्याने त्याचा फटका दालमिलला बसू लागला आहे. स्थानिक पातळीवर कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितींसह विदर्भातून कच्चा माल आणण्याची वेळ दालमिल चालकांवर आली आहे. विशेष म्हणजे हरभºयाच्या आयातीवर सरकारने पूर्णपणे बंदी घातलेली असल्याने त्याचा अधिक तुटवडा जाणवत असल्याचे दालमिल चालकांनी सांगितले.
परवानगी नसताना व्यापारी संकुलासाठी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची तीनशे मीटर भिंत पाडण्यात आल्याने ती जो पर्यंत बांधून दिली जात नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने घेतला. त्यामुळे १७ जूनपासून बाजार समितीमध्ये व्यापाºयांचा बंद सुरू आहे़
माल उपलब्ध होईना
गेल्या ११ दिवसांपासून बंद सुरूच असल्याने येथे माल खरेदी होत नसल्याने त्याचा परिणाम दालमिलवर होऊ लागला आहे. जळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. आधीच सरकारने एप्रिल महिन्यात कडधान्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने केवळ १५ टक्केच कच्चा माल विदेशात आयात करता येत आहे. हे प्रमाण कमी होण्यासह आता बाजार समितीमधील बंदमुळे स्थानिक पातळीवर माल उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
बाहेरील बाजार समितीमधून मालाची खरेदी
जळगावात माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितीमधून कच्च्या मालाची खरेदी केली जात आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात माल उपलब्ध होत नसल्याने दालमिल चालकांना अकोला, अमरावती, खामगाव येथे धाव घेऊन तेथून कच्चा माल आणावा लागत आहे. यात प्रवास खर्च वाढल्याने दालमिल चालकांना भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
उत्पादनावर परिणाम नाही
कच्चा माल उपलब्ध होत नसला तरी उत्पादन थांबलेले नाही. मात्र इतर शहरांमधून कच्चामाल आणावा लागत असल्याने खर्च वाढला असला तरी मागणी नसल्याने डाळींचे भाव वाढविता येत नसल्याचेचित्रआहे.त्यामुळे हा भूर्दंड दालमिल चालकांनाच सहन करावा लागत आहे.
दालमिलचा मोठा आधार
जळगावातील उद्योगांची स्थिती बिकट असताना दालमिल कसेबसे सावरून उद्योग वाढीला हातभार लावत आहे. त्यात अशा प्रकारच्या बंदमुळे उद्योगांवर परिणाम होत असेल तर ते उद्योगांसाठी मारक असल्याने बंदसंदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकाºयांनी लक्ष घालून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे दालमिल चालकांचे म्हणणे आहे.

बाजार समितीमधील व्यापाºयांनी पुकारलेल्या बंदमुळे स्थानिक पातळीवर कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितींसह अकोला, खामगाव, अमरावती येथून कच्चा माल आणावा लागत आहे. त्या मुळे कच्च्या मालासाठी खर्च वाढलेला आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन

Web Title: Bholandund to the junk drivers of Jalgaon Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव