प्रभारी राजमुळे विद्यापीठात भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:16 AM2021-03-26T04:16:58+5:302021-03-26T04:16:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी राजमुळे भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप अधिसभा ...

Bhongal administration in the university due to Raj in charge | प्रभारी राजमुळे विद्यापीठात भोंगळ कारभार

प्रभारी राजमुळे विद्यापीठात भोंगळ कारभार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी राजमुळे भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप अधिसभा सदस्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

महत्त्वाचे विषय असलेली सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करणे, हे मुळात चुकीचे आहे. आयोजनाच्या हेतू शुद्धतेबद्दल शंका उपस्थित करणार होते. त्यात प्रभारी कुलगुरूंना अधिसभेबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे विद्यापीठातील प्रभारी राजमुळे किती भोंगळ कारभार सुरू आहे याचे हे उदाहरण आहे. हा अधिसभेतील प्रकारामुळे चव्हाट्यावर आला. राज्य शासनाने संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी.

- एकनाथ नेहते, अधिसभा सदस्य

अध्यक्षाशिवाय बैठक बेकायदेशीर आयोजित करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप बैठकीत झाला. तो आरोप नव्हे तर वास्तविकता आहे. सभा रद्द होणे ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. ही विद्यापीठ विकासाच्या दृष्टीने खेदाची बाब आहे. यापुढे प्रशासनाने पारदर्शकता ठेवत विद्यापीठाचा कारभार सुरळीत चालू राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

- प्रा.डॉ. गौतम कुवर

सिनेटची सभा मुळात ऑफलाईन घ्यायला हवी होती. ती ऑनलाईन आयोजित केली. कुठलीही पूर्वसूचना न देता बैठकीचे सचिव बदलले. सर्वात महत्त्वाचे की तात्पुरत्या सचिवांनी अध्यक्ष उपस्थित नसताना सभा सुरू केली आणि ४५ मिनिटे चालवली. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर होती. या भोंगळ कारभाराचा राज्य सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणार आहे.

- अनिल पाटील, अधिसभा सदस्य

Web Title: Bhongal administration in the university due to Raj in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.