बीएचआरच्या आरोपींना आज न्यायालयात आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:51 AM2021-02-05T05:51:35+5:302021-02-05T05:51:35+5:30

जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या अपहार प्रकरणात कारागृहात असलेले चेअरमन प्रमोद रायसोनीसह १४ जणांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ...

The BHR accused will be brought to court today | बीएचआरच्या आरोपींना आज न्यायालयात आणणार

बीएचआरच्या आरोपींना आज न्यायालयात आणणार

Next

जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या अपहार प्रकरणात कारागृहात असलेले चेअरमन प्रमोद रायसोनीसह १४ जणांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयीन कामकाजात येणाऱ्या अडचणी व त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांनी हजर ठेवण्याबाबत कारागृह अधीक्षकांना न्यायालयाने आदेश बजावले आहेत. न्या.आर.एन. हिवसे यांच्या न्यायालयात त्यांना हजर केले जाणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी दिली.

पोलीस व रेड प्लसतर्फे रक्तदान शिबिर

जळगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस दल व रेड प्लस ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याहस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले. यावेळी ४ महिला व ३१ पुरुष अशा ३५ जणांनी रक्तदान केले. राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, उपनिरीक्षक भरत चौधरी, देवीदास वाघ, विजय शिंदे, सोपान पाटील,दीपक पाटील, दिव्या मराठे व सतीश देसले यांनी परिश्रम घेतले.

अल्पवयीन मुलीस पळविल्याप्रकरणी गुन्हा

जळगाव : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याप्रकरणी दीपक उर्फ निखिल किरण वाणी (रा.वराडसीम, ता.भुसावळ) या तरुणाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजी रामेश्वर कॉलनीतून मुलीला पळवून नेण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

Web Title: The BHR accused will be brought to court today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.