बीएचआर जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:26 AM2020-12-05T04:26:08+5:302020-12-05T04:26:08+5:30
बीएचआर प्रकरणात पोलीस शोध घेत असलेला अवसायक जितेंद्र कंडारे व उद्योजक सुनील झंवर या दोघांच्याविरुध्द लूक आऊट नोटीस जारी ...
बीएचआर प्रकरणात पोलीस शोध घेत असलेला अवसायक जितेंद्र कंडारे व उद्योजक सुनील झंवर या दोघांच्याविरुध्द लूक आऊट नोटीस जारी होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवडाभरापासून दोघं जण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. परदेशात पलायन करण्याची शक्यता लक्षात घेता आधीच खबरदारीचा उपाय म्हणून ही नोटीस बजावली जावू शकते, असे सांगण्यात येत आहे.
बीएचआरचा पैसा वॉटरग्रेसमध्ये गुंतविल्याची शक्यता : ॲड.विजय पाटील
बीएचआरमधील अपहाराचा पैसा वॉटरग्रेस या कंपनीत गुंतविल्याची शक्यता लक्षात घेता या दिशेनेही तपास व्हावा यासाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याची माहिती अॅड.विजय भास्कर पाटील यांनी दिली. दरम्यान, कोणत्या नगरसेवकाला किती पैसे मिळाले याचीही चौकशी करण्याबाबत आपण लेखी तक्रार करणार असल्याचे ॲड.पाटील यांनी सांगितले.