पाचोऱ्याला तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:07 AM2021-08-02T04:07:23+5:302021-08-02T04:07:23+5:30
ही जुनी वास्तू पाडली गेल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यातच निधीअभावी शहर तलाठी कार्यालयाचे बांधकाम ...
ही जुनी वास्तू पाडली गेल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यातच निधीअभावी शहर तलाठी कार्यालयाचे बांधकाम रखडले होते. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोय लक्षात घेता आमदार किशोर पाटील यांनी तत्काळ दखल घेत आपल्या स्थानिक विकास निधीतून १२ लक्ष रुपयांचा निधी देऊन ही इमारत बांधकाम करत नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतल्याने आनंद व्यक्त होत आहे.
तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी देणारे आमदार किशोर पाटील हे जिल्ह्यातील पाहिले आमदार ठरले आहेत. त्याबद्दल महसूल प्रशासनाने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत तर आमदार किशोर यांनी महसूल दिनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दीपक पाटील, कनिष्ठ अभियंता काजवे, सर्कल वरद वाडेकर, शहर तलाठी आर. डी. पाटील, पुरवठा अधिकारी अजिंक्य आंधळे, मयूर आगरकर उपस्थित होते.