२५ बांधांचे भूमिपूजन, सिंचनक्षमता वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:06+5:302021-06-25T04:13:06+5:30
अमळनेर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील कोळपिंप्री येथे डेडी नाल्यावर पाच बांधाचे तर बोदर्डे ...
अमळनेर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील कोळपिंप्री येथे डेडी नाल्यावर पाच बांधाचे तर बोदर्डे येथे डेडी नाल्यावर वीस बांधाचे भूमिपूजन अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोळपिंप्री येथे ५ बांध खोलीकरणाच्या कामासाठी ८.७० लाख रुपये तर बोदर्डे येथे डेडी नाल्यावर एकूण २० बांध खोलीकरणाच्या कामासाठी १०.४८ लाख रुपये असे एकूण २५ बांध खोलीकरण कामासाठी १९.१७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. नुकतेच त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास कृषी सहायक सुरेश लांडगे, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, उपसरपंच शशिकांत देवीदास काटे, भरत हिम्मतराव पाटील, माजी सरपंच सुनील कन्हैयालाल काटे, दीपक काटे, दत्तू काटे, सतीश काटे, महेश काटे, पृथ्वीराज काटे, जिजाबराव पाटील, गिरीश काटे, प्रफुल्ल काटे, पंडित काटे, सुभाष काटे, अण्णाभाऊ काटे, नानाभाऊ काटे, सुनील काटे, सदानंद काटे, देवानंद काटे, अनिल काटे, प्रमोद काटे, राजू काटे, योगराज काटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत उत्साह निर्माण झाला आहे.