मुंदाणे-बोळे रस्त्याचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:11+5:302021-06-28T04:12:11+5:30
आमदार चिमणराव पाटील यांनी ११ डिसेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांसह मुंदाणे-करंजी-बोळे रस्त्याची पाहणी केली होती. या वेळी नागरिकांनी आपल्या ...
आमदार चिमणराव पाटील यांनी ११ डिसेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांसह मुंदाणे-करंजी-बोळे रस्त्याची पाहणी केली होती. या वेळी नागरिकांनी आपल्या व्यथा व समस्या आमदार पाटील यांच्या समोर मांडल्या होत्या. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर रस्त्याची झालेली दुरवस्था बघून या रस्त्याबाबत शासनस्तरावर तत्काळ पाठपुरावा करून लवकरात लवकर रस्त्याचे काम कसे सुरू होईल व नागरिकांच्या समस्यांचे कसे निराकरण केले जाईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी नागरिकांना दिले होते. त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करून मुंदाणे-करंजी-बोळे रस्ताच्या मंजूर कामाचे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, जिल्हा परिषद कृषी सभापती दिनकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास पाटील, बाजार समिती उपसभापती दगडू पाटील, शेतकी संघ उपाध्यक्ष सखाराम चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. आर.बी पाटील, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, बाजार समिती संचालक मधुकर पाटील, डाॅ. पी.के. पाटील, प्रा. बी.एन. पाटील, शेतकी संघ अध्यक्ष डाॅ. राजेंद्र पाटील, संचालक सुधाकर पाटील, राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भिडू जाधव, राजेंद्र पाटील, चेतन पाटील, विचखेडे उपसरपंच गणपतराव गायकवाड, उपकार्यकारी अभियंता बाविस्कर, शाखा अभियंता अहिरराव, दीपक पाटील, साहेबराव गिरासे, रावसाहेब गिरासे, योगेश गिरासे, राजेंद्र गिरासे, जितू गिरासे, बोळे सरपंच राजेंद्र गिरासे, उपसरपंच रतन भिल, ढोली ग्रामपंचायत सदस्य यशवंत पाटील, महेंद्रसिंग राणावत, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील, युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान मगर, ठेकेदार ज्ञानेश्वर महाजन, दीपक नावरकर, पंकज बाविस्कर, गणेश मोरे, नाना सोनवणे उपस्थित होते.
निधीतून मंजूर कामे
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ते प्रजिमा ४९ला मिळणारा बोळे-मुंदाणे-कडजी रस्त्याची सुधारणा करणे (भाग कडजी ते बोळे तांडा फाटा) किंमत २५०.०० लाख
बोळे-मोंढाळे-बहादरपूर-अमळनेर रस्ता प्रजिमा ४९ कि.मी. (बोळे गावाजवळ) लहान पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम करणे व संरक्षक भिंत बांधणे - किंमत २५०.०० लाख.
आर्वी-शिरूड-बोळे-तामसवाडी-भडगाव रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे - किंमत २०० लाख