पुनखेडा पुलाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:08+5:302021-06-30T04:11:08+5:30
नवीन पूल बांधकामासाठी ३.९९ कोटी रुपयांची मंजुरी प्राप्त झाली आहे. पावसाळा आटोपल्यानंतर या पुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल. सध्या पावसाळ्यात ...
नवीन पूल बांधकामासाठी ३.९९ कोटी रुपयांची मंजुरी प्राप्त झाली आहे. पावसाळा आटोपल्यानंतर या पुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल. सध्या पावसाळ्यात नवीन कामाला सुरुवात करणे शक्य नसून, जि.प. बांधकाम विभागही त्यावर दुरुस्ती करू शकणार नाही. या तांत्रिक बाबी ध्यानात घेऊन कुणाच्या भडकवण्याने कामाची दिशा भरकटवू नका. विकासकामासाठी केव्हाही हक्काने या, तुमचे सदैव स्वागत असल्याचे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले.
पुनखेडा ग्रामस्थांनी आमदार चौधरी यांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या छोटेखानी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
पुनखेडा ग्रामस्थांतर्फे सरपंच कीर्ती पाटील, उपसरपंच सुरेश चौधरी, ग्रा.पं. सदस्य डिगंबर बोरसे यांनी आमदार चौधरी, रा.काँ. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष राजू सुवर्णे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष यशवंत धनके, पं. स. सदस्य दीपक पाटील आदींचे स्वागत केले.
दरम्यान, राहुल पाटील या युवकाने आमदारांनी शासनदरबारी पाठपुरावा करून नवीन पुलाला मंजुरी आणून मोठी समस्या धसास लावल्याने ग्रामस्थांतर्फे आभार मानले.
दरम्यान, सुमारे १०० मीटर लांबीचा हा पुनखेडा पूल काँक्रिट बॉक्स पद्धतीने बांधला जाणार असून, त्यासाठी ३.९९ कोटी रु. मंजूर झाले आहेत. पावसाळ्यात बांधकामासाठी खोदकाम केल्यास सद्य:स्थितीत सुरू असलेली वाहतूकही ठप्प होऊन हाल होणार असल्याने ऑक्टोबर महिन्यात या कामाला शुभारंभ करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता इम्रान शेख यांनी दिली.
यावेळी रमेश सावळे, आकाश चौधरी, प्रवीण पाटील, चेतन पाटील, राजेश पाचपोळे, समाधान पाटील, प्रदीप गिरी, राहुल पाटील, रमेश चौधरी, योगेश पाटील, गौरव कोळी, मयूर गोसावी, धीरज सावळे, सुनील कोळी शुभम चौधरी आदी उपस्थित होते.