भुसावळात जनआधार पार्टीच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: May 5, 2017 06:23 PM2017-05-05T18:23:27+5:302017-05-05T18:23:27+5:30
पोलिसांनी जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आह़े
Next
भुसावळ,दि.5- अस्वच्छतेबाबतीत देशात भुसावळचा दुसरा क्रमांक आल्यानंतर जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांच्या प्रतिमेला चपला-बुटांचा हार घातला होता़ या प्रकरणी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याने पोलिसांनी पुढाकार घेत जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आह़े
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जनआधारचे गटनेता उल्हास भीमराव पगारे, माजी नगरसेवक जगन देवराम सोनवणे, तुषार पाटील, नितीन धांडे, दुर्गेश ठाकूर, राहुल बोरसे, प्रा़धीरज गणेश पाटील, राहुल सोनवणे, आशिक खान शेरखान, श्याम भोसले, विशाल टोके, सचिन पाटील, नीना (पूर्ण नाव माहित नाही) व अन्य 10 ते 12 कार्यकत्र्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांनी 24 रोजी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन 37 (1) 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास पोलीस उपनिरीक्षक अंगद नेमाणे करीत आहेत़