भुसावळ, चोपड्यात दुपटीने रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:21+5:302021-04-28T04:18:21+5:30
जळगाव : जिल्ह्यात जळगाव शहरासह अन्य तालुक्यांमध्येही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, चोपडा व भुसावळमध्ये नव्या रुग्णांपेक्षा दुपटीने ...
जळगाव : जिल्ह्यात जळगाव शहरासह अन्य तालुक्यांमध्येही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, चोपडा व भुसावळमध्ये नव्या रुग्णांपेक्षा दुपटीने रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी १,०१२ रुग्ण आढळून आले असून, ९९५ रुग्ण बरे झाले आहेत. २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भुसावळला ४९ नवे बाधित आढळून आले असून, १४५ रुग्ण बरे झाले आहेत, तर चोपडा येथे ५३ नवे रुग्ण तर १०५ रुग्ण बरे झाले आहेत. जळगाव शहरात १६३ रुग्ण आढळून आले असून, २२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे मृतांची संख्या मात्र, जळगाव शहरात पुन्हा वाढली आहे. सर्वाधिक पाच बाधितांचे मृत्यू जळगाव शहरात झाले आहे. बाधित व संशयित असे एकूण ३९ मृत्यू जिल्ह्यात नोंदविण्यात आले आहेत.