भुसावळ येथे वैयक्तिक वादातून भावानेच केला भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:38 PM2019-06-08T13:38:28+5:302019-06-08T13:39:06+5:30
गंगाराम प्लॉट मधली घटना
भुसावळ, जि. जळगाव : वैयक्तिक कारणावरून दारूच्या नशेत सख्ख्या भावाचा खून करण्यात आल्याची घटना गंगाराम प्लॉट मध्ये शनिवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश प्रल्हाद पाटील (वय ३२) रा. गंगाराम प्लॉट असे मयताचे नाव आहे . त्याच्या गळ्यावर , छातीवर व पोटाच्या एका बाजूला धारदार शस्त्राने वार करून जखमा करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सकाळी पाचच्या वाजेच्या सुमारास गंभीर अवस्थेत घरात दिसून आला. त्यावेळी त्याला गोदावरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले . मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात त्याचा भाऊ स्वप्निल प्रल्हाद पाटील ( वय 28 ) यास ताब्यात घेण्यात आले आहे . मयत योगेश याचा मृतदेह नगरपालिका रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकतो , असे सूत्रांकडून सांगण्यात आले . दरम्यान, घटनास्थळी डी. वाय.एस.पी. गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देविदास पवार व सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.