भुसावळातील युवकाचा रेल्वेतून पडून मृत्यू

By admin | Published: July 16, 2017 05:29 PM2017-07-16T17:29:07+5:302017-07-16T17:29:07+5:30

भुसावळ : चौधरी कुटुंब शोकसागरात, पंचशीलनगर झाले सुन्न

Bhusavalya youth falls into a train and dies | भुसावळातील युवकाचा रेल्वेतून पडून मृत्यू

भुसावळातील युवकाचा रेल्वेतून पडून मृत्यू

Next

ऑनलाईन लोकमत

भुसावळ/ब:हाणपूर,दि.16- शहरातील  पंचशिलनगरातील आयटीआय  झालेला युवक पवन राजेश चौधरी (वय 23) याचा  15 रोजी संध्याकाळ साडेपाच वाजता 12112 नागपूर-इटारसी-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर रात्रभर मृतदेह घटनास्थळीच पडून होता. त्यानंतर नातेवाईकाने व्हॉटस्अॅपवरून पाठविलेल्या फोटोमुळे मयत पवनची ओळख पटली.
याबाबत पवन चौधरी याच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेली माहिती अशी की, पवन चौधरी हा युवक 15  जुलै रोजी सकाळी 11  वाजता ब:हाणपूर येथे प्लॉस्टीक  कागद (त्रिपाल)  घेण्यासाठी गेला होता. भुसावळ येथे परत येण्यासाठी तो नागपूर-भुसावळ व्हाया इटारसी इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये बसला.त्याच्या सोबत भुसावळातील काही नातेवाईक ब:हाणपूर येथे साखरपुडय़ासाठी गेले होते ते देखील होते मात्र ते मागच्या डब्यात होते. 
गाडीने ब:हाणपूर रेल्वे स्थानक सोडल्यानंतर ब:हाणपूरपासून तीन कि. मी. अंतरावरील बिरोदा रेल्वे गेट जवळ  रेल्वे खांब क्रमांक 491/21  वर पवन याचे डोके आदळल्याने तो खाली पडला आणि त्यातच तो मरण पावला असे, ब:हाणपूर येथील लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, ही घटना घडली तेव्हा पवन सोबतची मंडळींना याबाबत पुसटशीही कल्पना नव्हती. इंटरसिटी एक्स्प्रेस सायंकाळी 5.45 वाजता भुसावळ येथे आल्यानंतर नातेवाईक त्यांच्या घरी निघून गेले.
मृतदेह रात्रभर पडून 
पवन याचा मृतदेह रात्रभर पडून होता. आज सकाळी 7.30 वाजता ही घटना  ब:हाणपूर पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर मृतदेह ब:हाणपूर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.  दरम्यान, भुसावळ येथे सकाळी पवन आला नसल्याची चर्चा झाली. याच दरम्यान,  ब:हाणपूर येथील कोण्यातरी नातेवाईकांनी व्हॉटस्अॅपवर पवनचा फोटो टाकला. त्याच्या अंगावरील कपडे पाहून तो पवनच असल्याचे घरच्यांनी ओळखले आणि हंबरडा  फोडला.

Web Title: Bhusavalya youth falls into a train and dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.