भुसावळला पुन्हा गावठी कट्टा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 09:20 PM2020-03-08T21:20:17+5:302020-03-08T21:20:23+5:30
कोम्बींग आॅपरेशन : दोघे अटकेत, कारही जप्त
भुसावळ : शहरात गेल्या दोन-तीन महिन्यात गावठी कट्टे सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र गेल्या आठवड्याापासून पुन्हा गावठी कट्टे सापडण्यास प्रारंभ झाला आहे . त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे . शनिवार रोजी खुनाच्या आरोपीकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. तर यानंतर बाजारपेठ पोलिसांनी पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन करून रविवार रोजी दोघांना गावठी कट्टयाससह अटक केली आहे .
८ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास शहरात शिरपूर - कन्हाळा रोड वरील घोडेपीर बाबा दर्गा जवळ सार्व.जागी एका लाल रंगाची कार (एम . एच. ४३ - एन -६३५०) मधील इसमाजवळ गैरकायदा गावठी कट्टा असल्याची गुप्त बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड याना मिळाली. यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, स. पो.निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, स. फौ. तस्लिम पठाण, पो. हे .कॉ. सुनील जोशी, पो.ना. रविंद्र बिºहाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, उमाकांत पाटील, तुषार पाटील,नेव्हिल बाटली, पो. कॉ. विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईस्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी सदरचे वाहन अंधारात उभे असल्याचे पाहून त्यास चोहो बाजूने सपळा रचून दीपक संजय चौधरी ( ३५ ) रा.रामदेव बाबा मंदिर जवळ भुसावळ, ह मु लोणवाडी ता. बोदवड व कुंदन रामदास वानखेडे (२५ ) रा.रामदेव बाबा मंदीर जवळ भुसावळ यांना पकडले.
यावेळी कुंदन वानखेडेच्या कमरेला दहा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा मिळाला तर ६० हजार रुपये किमतीची लाल रंगाची कार जप्त करण्यात आली असून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.