लष्करासाठी भुसावळला तयार झाले अत्याधुनिक पिनाका लाँचर पॉड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 11:27 AM2022-04-02T11:27:18+5:302022-04-02T11:28:23+5:30

पोखरण येथे चाचणी : ७५ किमीवरून लक्ष्यभेद करण्याची क्षमता

Bhusawal builds state-of-the-art Pinaka launcher pod for army | लष्करासाठी भुसावळला तयार झाले अत्याधुनिक पिनाका लाँचर पॉड

लष्करासाठी भुसावळला तयार झाले अत्याधुनिक पिनाका लाँचर पॉड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ (जि. जळगाव)  :  भुसावळच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी (आयुध निर्माणी)मध्येनिर्मित अत्याधुनिक पिनाका लाँचर पॉड एमके - १  ची पोखरण येथे २९ मार्चला यशस्वी चाचणी करण्यात आली. हे पॉड तब्बल ३८ कि.मी.वरून आपला लक्ष्यभेद करणार आहे. भुसावळच्या आयुध निर्माणीचे हे मोठे यश मानले जाते. या चाचणीमुळे फॅक्टरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या सहा महिन्यांतील हे दुसरे यश आहे. डिसेंबर २०२१ मध्ये पोखरणमध्ये  पिनाका रॉकेट पॉडची  (डीपीआयसीएम) यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. 

भुसावळच्या या आयुध निर्माणीत दारूगोळा बनविण्याचे काम केले जाते. याच फॅक्टरीत सन २०१४ पासून  पिनाका रॉकेट लाँचर पॉड एमके-१ बनविण्याचे काम केले जात आहे. यासोबतच नवीन प्रकारचे पिनाका रॉकेट पॉड (डीपीआयसीएम)  अत्याधुनिक, तसेच  दिशानिर्देशित पॉड तयार करण्याचे कामही यशस्वीपणे सुरू आहे. 

काय आहे ‘पॉड’ प्रकरण? 
n‘पॉड’ हा रॉकेट प्रक्षेपण यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या ‘पॉड’मधून रॉकेट डागले जाते. रॉकेटचे उद्दिष्ट आणि दिशा पॉडवर अवलंबून असते. विविध प्रकारच्या चाचण्या पार केल्यानंतरच हे ‘पॉड’ रॉकेट लोड करण्यासाठी पाठविले जाते.
n आयुध निर्माणी आता मार्गदर्शित पिनाका लाँचर पॉड विकसित करण्यासाठी काम करीत आहे. एनहान्स्ड  पिनाका रॉकेटची क्षमता ४५ कि.मी.,  तर गाइडेड पिनाका रॉकेटची क्षमता ७५ कि.मी. आहे, अशी माहिती आयुध निर्माणीचे जनसंपर्क अधिकारी व डीजीएम बी. देवीचंद  यांनी दिली. या यशाबद्दल आयुध निर्माणी भुसावळचे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

 

Web Title: Bhusawal builds state-of-the-art Pinaka launcher pod for army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.