मोदी सरकारविरुद्ध भुसावळ शहर काँग्रेस कमिटीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:38+5:302021-05-31T04:13:38+5:30
भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष रवींद्र निकम यांच्या नेतृत्वात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मोदी सरकारचा निषेध करण्यात ...
भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष रवींद्र निकम यांच्या नेतृत्वात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. कोरोनासारख्या महामारीमध्ये मोदी सरकारचे अपयश, कोविड साथ रोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा, दुसऱ्या लाटेला रोखण्यात अपयश, लसीकरणात आलेले अपयश, पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव व महागाई, देशातील ढासळती अर्थव्यवस्था, नोटबंदी आणि जी.एस.टी.मुळे झालेली देशाची दुर्दशा, संपूर्ण देशातील वाढती बेरोजगारी, शेतकरीविरोधी काळे कायदे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की, रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, पेट्रोलियम कंपन्या, बँका अशा सरकारी आस्थापना विकायला काढल्या असून, ही जनतेची संपत्ती आहे. जनतेविरोधी कार्यवाहीचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, प्रदेश संयोजक भगवान मेढे, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, महेंद्र महाले, जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष राणी खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
----