भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 02:55 PM2020-12-08T14:55:30+5:302020-12-08T14:55:55+5:30

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा म्हणून भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे.

Bhusawal City Mahavikas Aghadi supports farmers' movement | भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

googlenewsNext

भुसावळ : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा म्हणून भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा, चंदीगड यासह देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर १२ दिवसांपासून न्याय मिळण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याची त्यांना आतंकवादी, खलिस्तानवादी असे संबोधून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. या विरोधात पंजाब, हरियाणा, चंदीगड भारतातील शेतकरी संघटनांनी नवीन कृषि कायद्याच्या विरोधात एकत्रित आले आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा म्हणून भुसावळ शहर महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रवीद्र निकम, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे तसेच शहर शिवसेनेचे अध्यक्ष बबलू बराटे यांनी कळविले आहे.

Web Title: Bhusawal City Mahavikas Aghadi supports farmers' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.