भुसावळ शहर महिनाभरात होणार खड्डेमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 22:30 IST2020-08-30T22:28:31+5:302020-08-30T22:30:28+5:30
भुसावळ शहरातील रस्त्यांची गेल्या पाच ते सात वर्षांपासून वाट लागली आहे.

भुसावळ शहर महिनाभरात होणार खड्डेमुक्त
भुसावळ : शहरातील रस्त्यांची गेल्या पाच ते सात वर्षांपासून वाट लागली आहे. मुख्य रस्त्यांसह सर्वच रस्ते अक्षरश उदध््वस्त झाले आहेत. माजी नगराध्यक्षांसह विद्यमान नगराध्यक्ष रस्ते बनवण्यात अपयशी ठरले आहेत. ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यातच यासंदर्भात आवाज उचलला आहे, तर आमदार संजय सावकारे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन रस्त्यांच्या कामासंदर्भात विचारणा केली आहे. महिनाभरात रस्ते पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी नूतन मुख्याधिकाºयांना दिले आहेत. त्यामुळे महिनाभरात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे माहिती मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
आमदार सावकारे यांनी शहरातील रस्त्यांसंदर्भात जिल्हाधिकारी राऊत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र देऊन नगरपालिकेत निधी शिल्लक असतानाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी केली. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार सावकारे व जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा केली. मुख्याधिकारी चिद्रवार यांना एका महिन्यात सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.
२५ रोजी पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासन अधिकाºयांनी भुसावळातील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती मागवली होती. त्यानुसार २९ रोजी पालकमंत्र्यांनी मुख्याधिकाºयांना निधी असूनही खड्डे का बुजवले जात नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर माजी मंत्री खडसे व आमदार सावकारे यांच्यासोबत पुन्हा चर्चा केली.
पालकमंत्री पाटील यांचे पत्र आले आहे. त्यामुळे तातडीने कार्यवाही करून एका महिन्यात पूर्ण शहर ‘खड्डे मुक्त’ करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी चिद्रवार यांनी ‘लोकमत’ला दिली.