भुसावळ - इटारसी तिस:या व चौथ्या रेल्वेमागार्चे सव्रेक्षण सुरू
By admin | Published: May 22, 2017 11:29 AM2017-05-22T11:29:50+5:302017-05-22T11:29:50+5:30
दोन ते अडीच महिन्यात कानपूरच्या कंपनीकडून होणार पहिले सव्रेक्षण
Next
रावेर, दि.22 - मध्य रेल्वेच्या भुसावळ ते इटारसी दरम्यान 306 कि.मी. अंतरावरील मंजूर झालेल्या तिस:या व चौथ्या रेल्वेमागार्चे सव्रेक्षण कानपूर येथील प्रिनव जीआयएस टेक्नॉलॉजीस प्रा.लि.या कंपनीच्या चार ते पाच पथकाकडून प्राथमिक सव्रेक्षणाची मोहीम सुरू झाली आहे. आगामी दोन ते अडीच महिन्यात या सव्रेक्षणाचा अहवाल मध्य रेल्वेकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कानपूर येथील प्रिणव जीआयएस टेक्नॉलॉजीस प्रा लि या कंपनीने इटारसी ते भुसावळ या 306 कि.मी.अंतरावरील रेल्वे मार्गाचे तिस:या व चौथ्या रेल्वेलाईनकरीता चार ते पाच पथकांद्वारे अप व डाउन बाजूने प्राथमिक सव्रेक्षण सुरू केले आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यात या सव्रेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर तिस:या व चौथ्या रेल्वेमार्गाची स्थळनिश्चीती होईल. वेळप्रसंगी पुन्हा अंतिम सव्रेक्षणाची मोहीम राबवली जावू शकते. सुरूवातीला तिस:या रेल्वेमागार्ला प्राधान्य देण्याची शक्यता असल्याचे सव्रेक्षण करणारे भौमिक कौशिक यांनी वर्तविली आहे.