किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भुसावळच्या खेळाडूंचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 10:47 AM2021-08-07T10:47:13+5:302021-08-07T10:48:17+5:30
भुसावळ : अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भुसावळातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळविले. अहमदनगर शहरात वाको इंडिया ...
भुसावळ : अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भुसावळातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळविले.
अहमदनगर शहरात वाको इंडिया किक बॉक्सिंग असोसिएशनने राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित केली होती.
राष्ट्रीय स्तरावर निवड चाचणी करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये भुसावळ तालुक्यातून व्हिक्टोरी सेल्फ डिफेन्स क्लासेसच्या खेळाडूंनी प्रावीण्य मिळविले.
विजेते खेळाडू असे-
प्रथमेश दिलीप आव्हाड (५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक) , मयूर संतोष हिवरे (५७ किलो वजनी गटात रौप्य पदक), महेश अरुण खरात (६१ किलो वजनी गटात रौप्य पदक), सिद्धार्थ दीपक सपकाळे (६५ किलो वजनी गटात कांस्य पदक).
मुलींमध्ये प्रज्ञा अण्णा शिंदे (५० किलो वजनी गटात रौप्य पदक), सानिया राकेश बग्गान (५५ वजनी गटात रौप्य पदक), शुभांगी सिद्धार्थ सहारे (७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक), तर सरिता सहारे हिने ४० किलो वजनी गटात सहभाग नोंदवला होता.
व्हिक्टोरी सेल्फ डिफेन्स क्लासेसचे प्रशिक्षक महेश कमलाकर तायडे, नितीन जे. अडकमोल, संघाचे कोच प्रशांत मकासरे व राकेश आगरकर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेश बग्गान, किरण गायकवाड, विक्की गायकवाड, सचिन गायकवाड, अमन भालेराव, अभिषेक भालेराव व विशाल लहोणे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.