भुसावळची लेडी डॉन सानिया कादरी आता केळी व्यावसायात
By admin | Published: May 10, 2017 11:31 AM2017-05-10T11:31:49+5:302017-05-10T11:31:49+5:30
बुधवारी केली सुमारे दीड कोटी रुपयांच्या केळीची खरेदी
Next
>भुसावळ,दि.10 - भुसावळात माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वर्चस्वाला आव्हान देणारी व लेडी डॉन म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांनी अचानक केळी वाहतूक आणि व्यापारात उडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या केळी वाहतुकीच्या क्षेत्रात सक्रीय झाल्या आहेत.
दरम्यान, बुधवार, 10 रोजी सानिया कादरी यांनी मुक्ताईनगर, पुरनाड, यावल आणि ऐनपूर येथील शेतक:यांकडील तब्बल 45 वाहने केळीची खरेदी करुन ती दिल्ली, कानपूर या भागातील बाजारपेठेत रवाना केल्याची माहिती शेतक:यांनी दिली. 45 वाहनांमधील (ट्राला) केळी मालाचे मूल्य तब्बल दीड कोटीच्या घरात असल्याची माहिती ऐनपूर येथील शेतक:यांनी ‘लोकमत’ दिली.
दरम्यान, ‘लोकमत’ने सानिया कादरी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, केळी व्यावसायात शेतक:यांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. व्यापारी केळी पिकवणा:या शेतक:यालाच लूबाडत आहेत. शेतकरी हित जपण्यासाठी आपण व्यावसायात आले आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सानिया कादरी यांनी भुसावळात वास्तव्य केल्यानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप होऊन भुसावळ नगरपालिकेने त्यांच्या बंगल्याचे बांधकाम पाडले होते. त्यानंतर भुसावळातील गोळीबार प्रकरणात सानियासह कुटुंबातील सदस्य व अंगरक्षकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होऊन अनेक दिवस जळगाव जिल्हा न्यायालयात कामकाज चालले. या दरम्यान त्या अनेक दिवस कारागृहात होत्या. या खटल्यात त्यांच्यावर आरोप सिद्ध न झाल्याने त्या निदरेष मुक्त झाल्या आहेत. दरम्यानच्या काळात सानिया कादरी यांनी बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली होती.