कल्याण-कसारा रेल्वे ब्लॉकमुळे भुसावळ-मुंबई पॅसेंजर दोन दिवस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 04:30 PM2019-05-17T16:30:10+5:302019-05-17T16:31:25+5:30

मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाऊन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान १९ रोजी साडेतीन तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे १८ व १९ मे रोजी मुंबई-भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.

Bhusawal-Mumbai passenger canceled for two days due to Kalyan-Kasara railway block | कल्याण-कसारा रेल्वे ब्लॉकमुळे भुसावळ-मुंबई पॅसेंजर दोन दिवस रद्द

कल्याण-कसारा रेल्वे ब्लॉकमुळे भुसावळ-मुंबई पॅसेंजर दोन दिवस रद्द

googlenewsNext
ठळक मुद्दे१९ रोजी कल्याण-कसारा येथे साडेतीन तासांचा रेल्वे ब्लॉकभुसावळ-मुंबई पॅसेंजर १८ व १९ रोजी रद्दअनेक गाड्यांच्या मार्गात बदल

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाऊन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान १९ रोजी साडेतीन तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे १८ व १९ मे रोजी मुंबई-भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली असून, या मार्गावरील अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
कसारा व कल्याण डाऊन मार्गावर १९ रोजी सकाळी ११.१५ ते २.४५ (साडेतीन तास ) विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे .
ब्लॉकचा परिणाम अनेक गाड्यांवर होणार आहे. यामुळे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून, काही गाड्या रद्दही करण्यात आलेल्या आहेत.
मार्ग बदलण्यात येणारी गाडी-
११०२६ पुणे-भुसावल एक्सप्रेस १९ रोजी पनवेल, कल्याणऐवजी दौंड, मनमाडवरून येणार आहे.
सुरुवातीच्या स्थानकावरुन १९ रोजी उशिरा सुटणाऱ्या गाड्या-
११०६१ एलटीटी -मुझफ्परपूर एक्सप्रेस १२.१५ ऐवजी १३.३० वाजता सुटणार आहे.
१२८६९ मुंबइ- हावडा एक्सप्रेस ११.०५ ऐवजी १५.०० वाजता सुटणार आहे.
११०५५ एलटीटी- गोरखपूर एक्सप्रेस १०.५५ ऐवजी १४.३० वाजता सुटणार आहे.
१२५४२ एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस ११.१० ऐवजी १५.०० वाजता सुटणार आहे.
०२०२१ मुंबई-नागपूर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस ११.३० ऐवजी १५.३५ वाजता सुटणार आहे.
११०७१ एलटीटी- वाराणसी एक्सप्रेस १२.४० ऐवजी १४.१० वाजता सुटणार आहे.
१२१८८ मुंबई- जबलपूर एक्सप्रेस १३.३० ऐवजी १३.४५ वाजता सुटणार आहे.
०४११६ मुंबई-अलाहाबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस १६.४० ऐवजी २० मे रोजी ००.२० वाजता सुटणार आहे.
१२०७२ जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस जालन्या वरुण सकाळी ०४.४५ ऐवजी ०७.४५ वाजता सुटणार आहे.
शॉर्ट टर्मिनेशन
१२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस नागपूर वरुण १८ रोजी सुटणारी ही गाडी नागपूर ते नाशिकपर्यंतच जाणार आहे.
१२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस १९ ला मुंबईऐवजी नाशिक ते नागपूरपर्यंत धावेल.
११०९४ वाराणसी-मुंबई महानगरी एक्सप्रेस वाराणसीवरुन १८ला सुटणारी वाराणसी ते दादर चालवण्यात येणार आहे.
रद्द गाड्या
ट्रेन क्रमांक ५११५४ भुसावळ-मुंबई पैसेंजर १८ रोजी रद्द करण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ५११५३ मुंबई-भुसावळ पॅसेंजर १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक १२११८ मनमाड-एल.टी.टी. गोदावरी एक्सप्रेस १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक १२११७ एल.टी.टी.- मनमाड गोदावरी एक्सप्रेस १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक २२१०२ मनमाड-मुंबई राज्य रानी एक्सप्रेस १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक २२१०१ मुंबई-मनमाड राज्य रानी एक्सप्रेस १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.
या ब्लॉक कालावधी दरम्यान १२८१२ एल टी टी स्थानकावर १३.४५ ऐवजी १६.१५ वाजता पोहोचेल
११०९४ मुंबई ऐवजी दादर स्थानकावर १४.१५ ऐवजी १६.३०वाजता पोहचणार आहे.
१२२९४ एलटीटी स्थानकावर १४.५५ ऐवजी १६.३० वाजता पोहचणार आहे.
१२१४२ एलटीटी स्थानकावर १५.१५ ऐवजी १७.१० वाजता पोहचेल. ११०८० एलटीटी स्थानकावर १६.०० ऐवजी १७.३० वाजता पोहचेल.
११०६० एलटीटी स्थानकावर १६.१५ ऐवजी १७:४५ वाजता, १२१६८ एलटीटी स्थानकावर १२.२५ ऐवजी १६.०० वाजता पोहचेल.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून ब्लॉक, तांत्रिक, तिसरी लाइन अशा अनेक कारणांमुळे पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे पूर्णता नियोजन कोलमडले असून, वेळेवर गाड्या रद्द झाल्या आहेत. यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

Web Title: Bhusawal-Mumbai passenger canceled for two days due to Kalyan-Kasara railway block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.