भुसावळ पालिकेच्या पथकाची १२ ठिकाणी धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 04:44 PM2020-07-10T16:44:35+5:302020-07-10T16:46:42+5:30
लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून नगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी शहरात १२ ठिकाणी कारवाई केली.
वासेफ पटेल
भुसावळ : लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून नगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी शहरात १२ ठिकाणी कारवाई केली.
अमळनेरच्या एका व्यक्तीला रस्त्यावर थुंकणे चांगलेच महागात पडले. त्याच्यावरही कारवाई करण्यात आली.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भुसावळ येथे ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. या काळात जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. असे असतानाही काही व्यवहार सुरू दिसले म्हणून उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा भूमी संपादन अधिकारी किरण सावंत-पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने धडक कारवाई केली.
चाहेल ढाबासमोरील दिलीप पटवारी यांचा वेफर्स कारखाना, खडका चौफुल्ली भागातील शेख रिजवान टायरवाले व खान्देश फेब्रिकेशन, वरणगाव रस्त्यावरील मनिरूल इस्लाम लष्कर गॅरेजवाले, म्युनिसिपल पार्कमधील भाजी विक्रेता अविनाश महेंद्र गोठले, सागर ठाकरे व प्रफुल घाडगे, गवळी वाड्यातील बब्बू किराणा दुकान, जळगाव रस्त्यावरील भारत रेडीएटर, जुना सातारा भागातील विश्वकर्मा फेब्रिकेशन या १० दुकानदारांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. पूजा कॉम्प्लेक्सजवळील भारत ट्रेडर्स सील करण्यात आले. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या अमळनेर येथील प्रशांत अशोक साळी यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.
या पथकात संजय बनाईते, पंकज पन्हाळे, सूरज नारखेडे, रामदास म्हस्के, चेतन पाटील, विशाल पाटील, किरण मनवाडे, अनिल मनवाडे, राजेश पाटील, स्वप्नील भोळे, गोपाल पाली, विजय राजपूत, योगेश वाणी, धनराज बाविस्कर, मयूर भोळे, मयूर भोई, दीपक शिंदे, पोलीस कर्मचारी पोकॉ.चारूदत्त पाटील, पो.कॉ. किशोर पाटील यांनी केली.