भुसावळ रेल्वे विभागाचा सात शिल्ड देऊन सन्मान
By admin | Published: April 12, 2017 01:07 PM2017-04-12T13:07:14+5:302017-04-12T13:07:14+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे या विभागाला यावर्षी मध्य रेल्वेतर्फे तब्बल सात ढाली मिळाल्या.
Next
>भुसावळ,दि.12- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे या विभागाला यावर्षी मध्य रेल्वेतर्फे तब्बल सात ढाली मिळाल्या. मंगळवार 11 रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयात मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांच्या हस्ते या विभागाला समारंभपूर्वक ढाली प्रदान करण्यात आल्या. त्यांचा स्वीकार डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी केला. पाच ढाली घेऊन डीआरएम गुप्ता व त्यांच्या टीमचे आज बुधवारी सकाळी रेल्वेने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच मोठय़ा उत्साहाने स्वागत करण्यात आले.
दरम्यान, यावेळी भुसावळ रेल्वे स्थानक ते डीआरएम कार्यालयार्पयत ढालींसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व विभागीय अधिकारी सहभागी झाले होते.
यावर्षी भुसावळ रेल्वे विभागाला चांगल्या कामाबद्दल पाच शिल्ड व तीन अधिकारी आणि 26 कर्मचा:यांना जीएम पुरस्कार देऊन मुंबईत गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण मंगळवारी मुंबईत झाले.
बुधवारी सकाळी जनता एक्सप्रेसने सुधीरकुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी डॉ. तुषाबा शिंदे, जीएम पुरस्कार प्राप्त कर्मचारी, अधिकारी यांचे भुसावळ रेल्वे स्थानक आणि तेथून व्हीआयपी साईडींगवर आगमन होताच त्यांचे अधिका:यांनी स्वागत केले.
मुंबईत मिळालेल्या शिल्ड हातात घेऊन रेल्वे स्थानक ते डीआरएम कार्यालयार्पयत ढोल-ताशे व बँडच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत स्वत: डीआरएम सुधीरकुमार गुप्ता व अधिकारी सहभागी झाले होते.