बुलेट ट्रेनच्या प्रशिक्षणासाठी भुसावळ रेल्वे विभागातील दोन अधिकाऱ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:14 PM2019-12-05T12:14:42+5:302019-12-05T12:15:11+5:30

जळगाव : मुंबई ते अहमदाबाद दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन चालविण्यात येणार आहे. यात जपान येथे होणाºया प्रशिक्षणासाठी देशभरातून ...

Bhusawal Railway Department selects two officers for bullet train training | बुलेट ट्रेनच्या प्रशिक्षणासाठी भुसावळ रेल्वे विभागातील दोन अधिकाऱ्यांची निवड

बुलेट ट्रेनच्या प्रशिक्षणासाठी भुसावळ रेल्वे विभागातील दोन अधिकाऱ्यांची निवड

Next

जळगाव : मुंबई ते अहमदाबाद दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन चालविण्यात येणार आहे. यात जपान येथे होणाºया प्रशिक्षणासाठी देशभरातून ४० अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. यात महाराष्टÑातील दोन जणांचा समावेश आहे. हे दोघे अधिकारी भुसावळ रेल्वे विभागात कार्यरत आहेत.
भुसावळ विभागातील तांत्रिक विभागाचे उप मुख्य अभियंता रोहित थावरे व रेल्वे सुरक्षा बलाच्या भुसावळ विभागाचे आयुक्त आकाश दुबे यांचा समावेश आहे. टोकियो येथे ९ ते २१ डिसेंबर दरम्यान हे प्रशिक्षण होईल.

Web Title: Bhusawal Railway Department selects two officers for bullet train training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव