भुसावळात साई सेवा समितीतर्फे दररोज सातशेवर पादचाऱ्यांना अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 06:22 PM2020-05-01T18:22:15+5:302020-05-01T18:27:07+5:30

भुसावळ , जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील साई सेवा समितीतर्फे सढळ हाताने परप्रांतीयसह शहरातील नागरिकांसाठी मदत कार्य सुरू आहे. ...

In Bhusawal, Sai Seva Samiti donates food to 700 pedestrians every day | भुसावळात साई सेवा समितीतर्फे दररोज सातशेवर पादचाऱ्यांना अन्नदान

भुसावळात साई सेवा समितीतर्फे दररोज सातशेवर पादचाऱ्यांना अन्नदान

Next
ठळक मुद्दे५० आशावर्कर यांना दिल्या जीवनावश्यक वस्तू१२०० नागरिकांची थर्मा मिटरने तपासणी

भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील साई सेवा समितीतर्फे सढळ हाताने परप्रांतीयसह शहरातील नागरिकांसाठी मदत कार्य सुरू आहे. दररोज सातशेपेक्षा जास्त पादचाऱ्यांसाठी अन्नदान, ५० आशावर्कर यांना जीवनावश्यक वस्तू तर प्रभागातील १२०० नागरिकांची नाँन कॉन्टॅक्ट थर्मामीटरने केली. तापाच्या तपासणीसाठी निर्मल कोठारी यांनी पुढाकार घेतला आहे.
महामार्गवरून परप्रांतीय जथ्थे आपापल्या राज्यात जाण्यासाठी पायी मार्गक्रमण करत असताना माणुसकीची हाक देत भुकेलेल्या व तहानलेल्या नागरिकांसाठी दररोज साई सेवा समितीतर्फे ६०० पादचाऱ्यांसाठी अन्नदान करण्यात येते. तसेच संकटकालीन परिस्थितीत नागरिकांसाठी आशावर्कर अहोरात्र योगदान देत आहे. समाजकार्यात मोठे योगदान देणाऱ्या अशा ५० आशावर्कर यांना पीठ, तेल, डाळी मीठ आदी जीवनावश्यक वस्तू सामाजिक बांधिलकी म्हणून देण्यात आल्या.
तसेच कोरोनासोबत लढण्यासाठी पालिका प्रशासनाला सहकार्य म्हणून श्री संत गाडगे बाबा रुग्णालयास दोन नॉन कॉन्टॅक्ट थर्मामीटर भेट देण्यात आले. कोरोनासोबत लढा देण्यासाठी शहरातील पालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे, तसेच प्रभागातील १२०० नागरिकांची थर्मामीटरने तापाची तपासणी करण्यात आली. स्वखर्चाने थर्मामीटर मागविण्यात आले आहे.
दरम्यान, लोणारी मंगल कार्यालय येथे अडकलेल्या परप्रांतीयांनाही जीवनाची व इतर साहित्याची सोय करण्यात आली. निर्मल कोठारी यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: In Bhusawal, Sai Seva Samiti donates food to 700 pedestrians every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.