रावेर येथे व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:36 PM2019-12-24T14:36:44+5:302019-12-24T15:02:17+5:30

व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील गत ४० वर्षांपासूनच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा, भारोत्तोलन स्पर्धा तथा संगीत, कला, साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक वा राजकीय क्षेत्रात महाविद्यालयाचा नावलौकिक प्राप्त करता यावा तथा त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आर्थिक निधी उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचा सूर माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आळवण्यात आला.

Bhusawal taluka will have a loan waiver of Rs 5 crore | रावेर येथे व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

रावेर येथे व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Next

रावेर, जि.जळगाव : येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील गत ४० वर्षांपासूनच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा, भारोत्तोलन स्पर्धा तथा संगीत, कला, साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक वा राजकीय क्षेत्रात महाविद्यालयाचा नावलौकिक प्राप्त करता यावा तथा त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आर्थिक निधी उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचा सूर माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आळवण्यात आला.
प्रारंभी, माजी विद्यार्थी संघटनेतर्फे स्वागत समारंभ पार पडला. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल होते. त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कोणते उपक्रम राबवावे याविषयी सूचित केले.
यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे टी .बी. महाजन, राजू खिरवडकर, अ‍ॅड.रमाकांत महाजन, राजकिरण शिवदे, प्रणित महाजन, लखन महाजन, स्मिता वाणी, सुनील वाघ, आरती पाटील या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपापल्या महाविद्यालयातील आठवणींना उजळा दिला .
दरम्यान, या कार्यक्रमात माजी विद्यार्थी तथा पोलीस नाईक योगेश टी. महाजन यांचा सत्कार करण्यात आला. गत दहा वर्षांपासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वेटलिफ्टिंगचे खेळात पारंगत करण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी असल्याने त्यांचा सहृद्य सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी राजकिरण शिवदे व कुंदन मानकर हे सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या माजी विद्यार्थी मेळाव्यात राज्य शिखर बँकेचे वरिष्ठ अधिकारी डी.एन.पाटील, नगरसेवक यशवंत दलाल, रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डी.सी.पाटील, प्रा.सी.एस.पाटील, रंगपंचमी व्याख्यानमालेचे अशोक पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.जी.आर.ढेंबरे यांनी केले, आभार प्रदर्शन डॉ.एस.जी.चिंचोरे यांनी केले. रावेर परिसरातून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते. माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.एस.जी. चिंचोरे, प्रा.डॉ.जे.एम.पाटील, प्रा.सी.पी.गाडे, प्रा.एस.डी.धापसे, प्रा.डॉ.बी.जी. मुख्यदल, प्रा.एम.एम.पाटील, प्रा.एस.यु.पाटील, प्रा.पी.व्ही.पाटील, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघटना यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Bhusawal taluka will have a loan waiver of Rs 5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.